वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी ५० लाख रुपयांची मागणी करणार्‍या शीव (मुंबई) रुग्णालयाच्या उपअधिष्ठात्यांना अटक

मुंबई – ‘एम्.बी.बी.एस्.’ झालेल्या एका युवतीला शीव रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता राकेश वर्मा यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी विद्यार्थिनी अलिशा शेख हिच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून २३ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी डॉ. वर्मा यांना अटक केले आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू असून अशा प्रकारे अन्य विद्यार्थ्यांचीही फसवणूक झाली आहे का ? याचा पोलीस शोध घेत आहेत.