साधकांची प्रज्ञा जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही (प.पू. डॉक्टरांचे) असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्लोक सुचवले.
अनुभूतीचा भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426740.html
३. भजे धर्मसूर्यं, भजे ज्ञानसूर्यं भजे ब्राह्मतेजसं भजे ज्ञानतेजसम् ।
भजे शिष्यभावं भजे पूर्णयत्नं भजेऽहं परात्परगुरुं श्रीश्रीजयन्तम् ॥ ३ ॥
अर्थ : धर्मसूर्य आणि ज्ञानसूर्य असलेल्या; ब्राह्मतेज आणि ज्ञानतेज असलेल्या; शिष्यभावात रहाणार्या आणि पूर्णप्रयत्नरत असलेल्या श्री श्री जयंत नावाच्या परात्पर गुरूंची मी आराधना (भक्ती) करतो.
‘देवा, तू जे सुचवलेस, ते मी लिहिले आणि तुला अर्पण केले. काही राहिले असेल, तर क्षमा करावी.
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।’
गुरुचरणी शरणागत,
– सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०१६)
(क्रमश: उद्याच्या अंकात)
अनुभूतीचा भाग ४. पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/427396.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |