साधकांची प्रज्ञा जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही (प.पू. डॉक्टरांचे) असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्लोक सुचवले.
अनुभूतीचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426466.html

२. वसन्तविभवं हिन्दुधर्मस्य,
अनन्तं प्रीतिसागरम्
सुहास्यरम्योज्ज्वलवदनं,
विलासचारुचरितम् ।
ध्यायेत् बालाजीतनयं,
नलिनीनन्दनं गुरुवरं नित्यानन्दरूपम्
यस्य स्मरणमात्रेण पापतापविकल्पाश्च विनश्यन्ति ॥ २ ॥
(‘या श्लोकात, गुरुदेवांच्या भावंडांची आणि आई-वडील यांची नावे असावीत’, ही सुप्त इच्छा देवाने पूर्ण केली. ही नावे अधोरेखित केली आहेत.) (‘वसंत, अनंत, सुहास आणि विलास ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावंडांची अन् बाळाजी आणि नलिनी ही त्यांच्या आई-वडिलांची नावे आहेत.’ – संकलक)
अर्थ : हिंदु धर्माचे वसंतवैभव असलेल्या, प्रीतीचा अनंत सागर असलेल्या, मनोहर आणि तेजस्वी मुखावर सुहास्य विलसत असलेल्या, सुंदर आचरणाचा विलास असणार्या, (पिता) बाळाजी आणि (माता) नलिनी यांच्या पुत्राचे, नित्यानंदरूपी त्या श्रेष्ठ गुरूंचे (श्री श्री जयंतांचे) ध्यान करावे; ज्यांचे केवळ स्मरण केले असता सर्व पापे, त्रिविध ताप आणि नाना विकल्प यांचा नाश होतो.
‘देवा, तू जे सुचवलेस, ते मी लिहिले आणि तुला अर्पण केले. काही राहिले असेल, तर क्षमा करावी.
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।’
गुरुचरणी शरणागत,
– सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०१६)
(क्रमश: उद्याच्या अंकात)
अनुभूतीचा भाग ३ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/427105.html
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !