धर्मांतर थांबवण्यासाठी हिंदूंनी सीमोल्लंघन करण्याची आवश्यकता !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. हिंदु धर्माचा अभ्यास करण्यासह धर्माचरण करण्याचे महत्त्व !

प्रत्येक व्यक्तीच्या मनात सनातन हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची काहीतरी प्रेरणा आहे.

मी वर्ष २००० मध्ये ‘काशी हिंदु विश्वविद्यालया’त वेदांतामध्ये ‘आचार्य’ झालो. त्यानंतर ‘हिंदु राष्ट्र कसे बनेल ? आणि सामाजिक एकता कशी प्राप्त करावी ?’, या विषयांवर साधू-महात्मा यांच्या सान्निध्यात राहून विचार करण्याचा प्रयत्न केला. हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार होण्यासाठी हिंदूएकतेच्या भावनेला शक्तीशाली बनवण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे लक्षात आले. केवळ हिंदु धर्म जाणून घेतला; पण धर्माचरण केले नाही, तर त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे हिंदु धर्मातील वास्तविक तत्त्व जाणून घेऊन ते जीवनात उतरवणे आवश्यक आहे. स्वतःच्या दैनंदिन व्यवहारात चरित्र दिसून आले, तरच स्वतःचा लोकांवर परिणाम होणार आहे.

पू. महामंडलेश्वर वेदांताचार्य स्वामी श्रीप्रणवानंद सरस्वती महाराज यांचा परिचय

पू. महामंडलेश्वर वेदांताचार्य स्वामी श्रीप्रणवानंद सरस्वती महाराज

पू. महामंडलेश्वर वेदांताचार्य स्वामी श्रीप्रणवानंद सरस्वती महाराज हे ‘श्री अखंड प्रणव योग वेदांत पारमार्थिक न्यास’ संचालित ‘गुरुकुल छात्रावास, इंदूर’ याचे संस्थापक आहेत. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी आत्मज्ञानाच्या शोधार्थ घराचा त्याग केला. त्यानंतर त्यांनी श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ स्वामी श्री अखंडानंद सरस्वती महाराज आणि पू. संत श्री योगीराज पहाडी बाबाजी यांच्याकडून ‘योगदीक्षा’ घेतली. वर्ष २०१३ मध्ये त्यांना श्रीपंचायती महानिर्माणी आखाड्याकडून ‘महामंडलेश्वर’ पदावर अभिषिक्त करण्यात आले.

२. धर्महीनतेमुळे हिंदूंचे ख्रिस्ती आणि मुसलमान पंथांमध्ये धर्मांतर !

आज सामाजिक माध्यमांतून हिंदु राष्ट्राला खंडित करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न होत आहेत. त्याला थांबवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. येथे मूठभर इंग्रज आले आणि त्यांनी त्यांची इंग्रजी भाषा संपूर्ण देशावर लादली. मूठभर मोगल आले आणि त्यांनी उर्दू लागू केली; परंतु गेल्या ७८ वर्षांत आपण स्वतःची राष्ट्रभाषा आणि ‘भारतीय शिक्षणपद्धत’ संपूर्ण देशभर लागू करू शकलेलो नाही. त्यामुळे समाजात नास्तिकता, धर्महीनता, विद्रोह इत्यादी विकृती निर्माण झाल्या आणि हिंदूंच्या धर्मांतरात वाढ झाली. आपण मोगलांना पळवून लावले; पण अन्य पंथीय करत असलेल्या धर्मांतरावर विजय मिळवू शकलो नाही. धर्मांतरामागे खरे कारण गरिबी नसून ‘धर्महीनता’ आहे. त्यामुळे आपला धर्म शेवटच्या स्तरापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

३. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोचणे आवश्यक !

समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत धर्मप्रसार करण्यासाठी मी वर्ष २००५ मध्ये ४० दिवसांत ४०० किलोमीटची पदयात्रा काढली. तो भाग मागासलेला, तसेच ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे प्राबल्य असणारा होता. मी त्यांना म्हटले, ‘बंधूंनो, मी एक संन्यासी आहे. माझ्यासाठी सर्व एकसमान आहेत. मी हिंदु धर्मावर पुष्कळ प्रेम करतो. ‘हिंदु’ शब्दासाठी मी बलीदान करू शकतो. मी अत्यंत गरीब घरी भोजन केले. त्यांच्यात पालट करण्यासाठी कुठे ना कुठे प्रक्रिया आरंभ करणे आवश्यक होते. त्यांच्याकडे कुणीतरी साधूसंत यावे, असे त्यांना वाटायचे. त्यांच्यामध्ये एवढा स्वाभिमान जागृत झाला की, त्यांना वाटले जणू सहस्रो वर्षांपासून ते ज्या क्षणाची वाट पहात होते, ते मिळाले. नंतर मी तेथे सतत जात राहिलो. अशाच प्रकारे आम्ही मध्यप्रदेशमध्ये १२ दिवसांची एक विशाल यात्रा काढली. आम्ही गरीब लोकांकडे गेलो. त्यांना एवढा आनंद झाला की, त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्यांनी आमची पाद्यपूजा केली आणि त्यांच्या घरात बसवून आम्हाला प्रेमाने भोजन दिले. पुढील पिढीमध्ये आपण एक साधू किंवा पुरोहित म्हणून त्यांच्या घरात जाऊ शकणार नाही, अशी स्थिती सध्या आहे. धर्मांतर करणारे लोक त्यांच्या घरी जाऊन आधी ४ थैल्या (पैशाच्या पिशव्या) देतात, त्यांना आपलेसे करतात आणि नंतर त्यांचे धर्मांतर करतात.

सनातन संस्थेच्या पाठीशी पुष्कळ मोठी शक्ती कार्यरत आहे !

‘सनातन संस्थेविषयी मी ऐकले, तेव्हा मला पुष्कळ चांगले वाटले. या संस्थेच्या पाठीशी पुष्कळ मोठी दैवी शक्ती कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न निश्चित साकार होईल. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. गुरुदेव डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) एक महातपस्वी आहेत. त्यांच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, त्यांचे गुरुदेव, सर्व हिंदु देवीदेवता आणि साधू-महात्मे यांची शक्ती आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याने वा आंदोलनाने आज एक वैश्विक रूप घेतले आहे.’

– पू. महामंडलेश्वर वेदांताचार्य स्वामी श्रीप्रणवानंद सरस्वती महाराज

४. हिंदूंनी सीमोल्लंघन करून विस्तारवादी बनणे आवश्यक !

हिंदूंनी सजग, आक्रमक आणि विस्तारवादी राहिले पाहिजे. या ३ गोष्टी आपल्यात येत नाहीत, तोपर्यंत आपण हिंदु धर्माला देशाच्या भूमीत सुरक्षित ठेवू शकत नाही. या ३ गोष्टीच स्वतःचे कुटुंब, भूमी, राष्ट्र आणि धर्म यांचे संरक्षण करणार आहे. संपूर्ण जगात सनातन धर्म पसरलेला होता. कंबोडियामधील विशाल मंदिर याची साक्षी आहे. आपल्या मातृभूमीप्रती संकुचित भावना आपल्याला विस्तारवादी होण्यापासून थांबवते. त्यामुळे आपण सीमोल्लंघन करून विस्तारवादी बनणे आवश्यक आहे. आपल्याला सर्वांना रामभक्त बनवून प्रत्येकामध्ये हिंदु राष्ट्राची संकल्पना निर्माण करायची आहे, तेव्हाच ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण होणार आहे. आपण सर्वजण हिंदु आहोत, हे लक्षात ठेवून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

– पू. महामंडलेश्वर वेदांताचार्य स्वामी श्रीप्रणवानंद सरस्वती महाराज, संस्थापक, श्री स्वामी अखंडानंदजी गुरुकुल आश्रम, इंदूर, मध्यप्रदेश.