हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष 

१. पृथ्वीराज चौहानच्या अतीक्षमाशीलतेमुळे भारत ८०० वर्षांच्या गुलामगिरीत

‘वर्ष ७१२ मध्ये महंमद बिन कासिमने भारतावर आक्रमण केले, तेव्हा भारत लहान लहान राज्यांमध्ये विभागला गेला होता. महंमद गझनीने सोमनाथपर्यंत येऊन अनेक मंदिराची तोडफोड करून संपत्ती लुटली. एवढ्या विशालकाय हिंदु राष्ट्रात सर्व जण विभागलेले नसते, तर आक्रमकांना मंदिराची तोडफोड करता आली नसती. ‘क्षमा हा विराचा अलंकार आहे’, या वाक्याचा पृथ्वीराज चौहानने चुकीचा वापर केला. त्याने १६ वेळा महंमद घोरीला हरवून क्षमा केली; पण १७ व्या वेळी महंमद घोरीने दगाबाजी करून पृथ्वीराज चौहानचा पराभव केला आणि त्याला ठार मारले. पृथ्वीराज चौहानच्या अतीक्षमाशीलतेमुळे वर्ष ११९२ पासून आजपर्यंत संपूर्ण भारत पारतंत्र्याचे दुर्दैव सोसत आहे. आज आपले वैभव इतिहास बनून राहिले आहे आणि आपण स्वतःला प्रस्थापित करण्याच्या विवंचनेत आहोत.


पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांचा परिचय

पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन

सर्वोच्च न्यायालयात कार्यरत पू. अधिवक्ता हरि शंकर जैन हे गेल्या ४२ वर्षांपासून अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. ते ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेचे संरक्षक आहेत. त्यांनी श्रीराम जन्मभूमीचा खटला लढून विजय संपादन केला. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळेच आज श्रीराम जन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले आहे.

२. हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष केल्याचा लक्षावधी शूरविरांचा पुष्कळ मोठा इतिहास

आज आपल्या अस्तित्वावरच संकट आले आहे. या अस्तित्वाच्या संकटाशी लढत असतांना काही लोक ‘हिंदू-मुसलमान असे काही असते का ?’, असे विचारतात. ते आज धृतराष्ट्रासारखे अंध बनले आहेत. या देशात हिंदूंची अत्यंत वाईट स्थिती असून ते गुदमरले जात आहेत. या देशात हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष केल्याचा पुष्कळ मोठा इतिहास आहे. हा संघर्ष करणारे लक्षावधी लोक आहेत. बाप्पा रावल याने बहराईचमध्ये गझनीच्या संपूर्ण दीड लाख मोगल सेनेला कापून काढले होते. त्यानंतर १५० वर्षे या हिंदुस्थानावर कोणतेच आक्रमण झाले नाही. हिंदु माता-भगिनींनी जोहार करणे, स्वाभिमानी महाराणा प्रतापने गवताची भाकरी खाऊन दिवस काढणे, शिखांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचे शिर कापून घेणे, गरम तव्यावर बसवल्यावरही त्यांनी धर्मांतर करण्यास नकार देणे, अशा गोष्टींचे आपण स्मरण केले पाहिजे.

३. ईश्वरी न्याय, जनतेचा न्याय आणि न्यायालयाचा न्याय !

एक असतो ईश्वरी न्याय, दुसरा जनतेचा न्याय आणि तिसरा आहे, न्यायालयाचा न्याय ! ईश्वरी न्याय मिळावा; म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्म समृद्ध केले आहे. त्यांनी आपण साधनेच्या बळावर सर्व वाईट शक्तींचे दमन करू शकतो आणि हिंदु राष्ट्राची संकल्पना साकार करू शकतो, हे सांगितले आहे. आपण योग्य ठिकाणी मतदान करून न्याय मिळवू शकतो, हा जनतेचा न्याय आहे. त्यामुळे जो राष्ट्राला पुढे घेऊन जाईल आणि हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न करेल, त्यालाच मतदान केले पाहिजे. न्यायालयीन लढाईतून न्यायालयाचा न्याय मिळवणे, हा न्यायालयाचा न्याय आहे.

भारतात वेद आणि शास्त्र यांच्या जाणकारांनाच न्यायमूर्तीपदी नेमणे आवश्यक !

न्यायाधिशांना वेद आणि शास्त्र यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्यांना वेदशास्त्रांचे ज्ञान नाही, त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेत रहाण्याचा अधिकार नाही, असा कायदा करायला हवा. हॉर्वर्डसारख्या विदेशी शिक्षणपद्धतीनुसार आपल्याला कधीच न्याय मिळू शकत नाही. जो वेद आणि शास्त्र जाणतो, त्यालाच उच्च न्यायालय अन् सर्वाेच्च न्यायालय येथे न्यायमूर्ती करायला हवे.’ – पू. अधिवक्ता जैन

४. देशाला हिंदु धर्मशास्त्राच्या नियमांची आवश्यकता !

अ. कोणतेही सरकार हिंदु राष्ट्र बनवू शकत नाही; कारण दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यानंतरच राज्यघटनेत संशोधन करता येते. प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे कलम १४; नागरिकांना धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून होणार्‍या भेदभावापासून संरक्षण देणारे कलम १५, तसेच अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करणारे कलम २९ आणि कलम ३० रहित व्हायला पाहिजे. धर्माचा कायदा सर्वांसाठी एकसारखा असू शकत नाही. सर्वांना हिंदु धर्मानुसार चालावे लागेल, अशीच आपली इच्छा असली पाहिजे. ज्या दिवशी आपण संघटित होऊ, तेव्हा आपण सर्व हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अग्रेसर होतील.

आ. पाकिस्तानमध्ये २२ टक्के हिंदु होते; पण आज २ टक्केही शेष नाहीत. जे आहेत, ते तेथे अक्षरशः गुलामगिरीचे जीवन जगत आहेत. २० टक्के हिंदूंना बलपूर्वक मुसलमान बनवण्यात आले. त्यांना आजही हिंदु धर्मात परत यायचे आहे; पण त्यांना त्यांचे मौलाना ठार मारतील, अशी भीती आहे. आपल्याला त्यांची भीती नष्ट करावी लागेल. काश्मीर येथील मुसलमानांनाही हेच वाटते की, ते हिंदु धर्मात परत आले, तर मुसलमान त्यांना जिवंत ठेवणार नाहीत. अशाच प्रकारे देशाच्या कानाकोपर्‍यात रहाणार्‍या अनेकांची इस्लाममध्ये घुसमट होत आहे. ते घुसमटून मरत असतांना आपण ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या गोष्टी करत आहोत. त्याऐवजी या लोकांना हिंदु धर्मात घेऊन त्यांना येथील चांगले वातावरण अनुभवू द्या.

इ. चीनने प्रत्येक घरटी एक मूल केले. आज चीन दुसरे-तिसरे मूल जन्माला घालण्यासाठी लोकांना पैसे वाटत आहे. आज तेथे सर्व लोक ५० वर्षांच्या पुढचे आहेत. त्यांच्याकडे नवयुवकांची कमतरता आहे. जी चूक चीनने केली, तिच चूक आपण करणार आहोत का ? आपण तात्पुरता उपाय सोडून मुळाशी गेले पाहिजे. आपल्याला हिंदूंची लोकसंख्या वाढवली पाहिजे.

ई. आपला आदर्श वेद आणि शास्त्रे आहेत. त्यात कुठेही अल्प मुले जन्माला घालण्यास सांगितलेले नाही. मुले ईश्वराची रूपे असतात. त्यांचे पालनपोषण ईश्वरच करत असतो. इतिहास पुरुष होऊ शकणारा व्यक्ती कुठेही जन्म घेईल आणि या देशाचे भाग्य पालटून टाकेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याला थांबवण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपण वेद आणि शास्त्र यांनी बांधलेले आहोत. आपल्याला आपल्या धर्माशी बांधीलकी आहे. कोणतीही ऋचा, वेद, शास्त्र किंवा उपनिषदे यांमध्ये कुठेही लोकसंख्या नियंत्रणाचा कोणताही कायदा नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी वर्ष १९७२-१९७३ मध्ये लोकसंख्या घटवण्याचा प्रयोग केला होता. हिंदूंनी ते स्वीकारल्यानंतर श्रीमती गांधींनी अल्पसंख्यांकांसाठी विशेष कायदा बनवला. आता आपले सर्व व्यवसाय संपुष्टात आले असून ते सर्व धर्मांधांच्या हातात गेले आहेत.

५. मोगलांनी हडपलेल्या विविध मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा

‘ज्या कोणत्याही हिंदु मंदिराची तोडफोड करण्यात आली होती किंवा ज्यांच्यावर धर्मांधांनी ताबा मिळवला होता, त्या सर्व मंदिरांना आम्ही परत मिळवणारच’, अशी माझी प्रतिज्ञा आहे. सध्या काशी विश्वनाथचे मंदिर, मथुरा येथील भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान, धार येथील भोजशाळेमधील माता सरस्वतीचे जन्मस्थान, कुतूबमिनार येथे २७ हिंदु आणि जैन मंदिरे तोडून कुव्वतइस्लाम मशीद बांधण्यात आली आहे. ताजमहल जे पूर्वीचे शिवालय आहे, त्याला शहाजहानने बलपूर्वक मानसिंहचा नातू राजा जयसिंहकडून बळकावले होते. त्यासाठी आमचा खटला चालू आहे. टेकडीवरील (टीलेवाली) मशीद वास्तविक तिलेश्वर महादेव मंदिर होते. औरंगजेबाच्या काळात तेथील मंदिर तोडून मशीद बनवण्यात आली होती. असे अनेक न्यायालयीन संघर्ष चालू आहेत. यासमवेतच अनेक ठिकाणी मजार (दर्गे) बांधून सार्वजनिक भूमी हडपल्या जात आहेत, त्या विरोधातही आम्ही संघर्ष करत आहोत. प्रयागराज येथे ‘चंद्रशेखर आझाद पार्क’ आहे. तेथे १६ मजारी आणि १ मशीद उभारण्यात आली होती. त्याविरोधात आम्ही उत्तरप्रदेश उच्च न्यायालयात गेलो. ऑक्टोबर २०२२ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने सर्व १६ मजारी आणि मशीद नेस्तनाबूत करण्यात आल्या.

– पू. अधिवक्ता हरि शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय, देहली.