‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।

आज भल्या पहाटे मला (सूक्ष्मातून) देव (टीप १ ) भेटला अन् म्हणाला,   

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भिऊ नकोस माझ्या बाळा,
मी तुझ्या पाठीशीच सदा ।। १ ।।

श्री. अमित दातेकर

युगानुयुगे मी दुर्जनांचा नाश करूनी
सज्जनांना तारले ।। २ ।।

या वेळी, तर मी केवळ अस्तित्वाने, 
हिंदु राष्ट्र साकारणार आहे ।। ३ ।।

 केवळ नाव घे तू माझे,
अन् कर तू अहं अन् स्वभावदोष यांवर वार ।। ४ ।।

वर्तमानात राहून राबव प्रक्रिया (टीप २),
अन् आता भूतकाळाला मागे सार ।। ५ ।।

अधर्माचा हा वक्रतारा,
आता अस्त पावत आहे ।। ६ ।।

रामकार्यासाठी वीर मारुति
आकाशी झेपावत आहे ।। ७ ।।

हिंदु राष्ट्ररूपी अश्वमेध यज्ञाचा अश्व,
वायूवेगे धावत आहे ।। ८ ।।

काळरात्रीला मागे सारून,
क्षितिजावर धर्मसूर्य उगवत आहे ।। ९ ।।

आता मात्र तुझी गती (टीप ३) वाढव हा बाळा,
मी तुझी वाट पहात आहे’ ।। १० ।।

मी देवाला म्हटले,

‘देवा,  न मागताच तू मला सर्वकाही दिले आहेस,
आतापर्यंत माझ्यासाठी पुष्कळच केले आहेस’ ।। ११ ।।

टीप १ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

टीप २ : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया

टीप ३ : साधनेची

– श्री. अमित दातेकर, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (८.७.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.