नुकताच बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर तेथील वास्तवस्थितीविषयी भाष्य करणारा लेख…
नुकत्याच बंगाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये १५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या आणि कट्टर हिंदुद्वेष्टा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा, म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा सपशेल पराभव झाला. बंगाली लोकांनी २९४ पैकी तब्बल २०६ जागांवर, म्हणजेच ७१ टक्के जागांवर भाजपला निवडून आणले. या पार्श्वभूमीवर बंगालची हिंसाचाराची सद्यःस्थिती, तेथील नागरिकांची मानसिकता, भाजपला एवढ्या जागा कशा मिळाल्या ? यांविषयी बंगालच्या एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्याने ‘सनातन प्रभात’ला माहिती दिली. ती येथे देत आहोत.
१. बंगाली मतदारांची वैशिष्ट्ये
‘बंगालच्या निवडणुकांचे एक वैशिष्ट्य आहे, तेथील लोकांनी सरकार पालटण्याचे ठरवले, तर ते पूर्णपणे शांत रहातात. कुणाला मत देणार ? हे ते अजिबात सांगत नाहीत. या निवडणुकीतही त्यांनी गप्प रहाणेच पसंत केले आणि अजिबात तोंड उघडले नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे, हे कळू शकले नाही. बंगालच्या लोकांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (साम्यवाद्यांना) बंगालची सत्ता दिली, तेव्हाही त्यांनी पुष्कळ शांतपणे काम केले. वास्तविक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकपची) संघटना तितकी सबळ नव्हती, तरीही लोकांनी त्यांना मतदान केले. बंगालचे आणखी एक वैशिष्ट्य, म्हणजे ते ज्यांना एकदा निवडून देतात, त्यांनाच परत १० किंवा १५ वर्षांसाठी कायम ठेवतात. ते त्यांना विकासासाठी पुरेसा वेळ देतात. त्यामुळेच त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ३४ वर्षे आणि तृणमूल काँग्रेस पक्षाला १५ वर्षे सत्ता दिली.
२. ‘भाजपला सत्तेवर आणले नाही, तर मुसलमानांचे वर्चस्व प्रस्थापित होईल’, ही हिंदूंमध्ये भीती !
या वेळी बंगाली मतदारांचा कल काही वेगळाच होता. त्यांनी कोणत्याही राजकीय कार्यक्रमाकडे (‘अजेंडा’कडे) पाहून मतदान केले नाही. बंगालच्या लोकांना हे पटले होते की, या वेळी भाजपला सत्तेवर आणले नाही, तर तेथे मुसलमानांचे वर्चस्व प्रस्थापित होईल, जे आधीपासूनच वाढलेले आहे. समजा एखाद्या गावात मुसलमानांची लोकसंख्या जरी केवळ १५ ते २० टक्के असली, तरी तेथे तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे सर्व कार्यकर्ते मुसलमान असतात, ही वस्तूस्थिती आहे. या गोष्टीकडे लोकांनी धार्मिक दृष्टीकोनातून पाहिले. त्यामुळेच लोकांनी हिंदुत्व वाचवण्यासाठी भाजपला सत्तेवर आणले. गेल्या ४० वर्षांतील माझ्या सामाजिक जीवनात अशा प्रकारे झालेले हिंदूसंघटन मी पाहिलेले नाही. भाजपलाही वाटले नव्हते, अशा प्रकारे हिंदूंनी संघटित रूपाने धार्मिक दृष्टीकोनातून मतदान केले.
हिंदुत्वनिष्ठ पक्षामागे साधूसंतांची आध्यात्मिक शक्ती

हिंदुत्वनिष्ठांसह बंगालमधील संतांनीही या निवडणुकीत मोठे कार्य केले. त्यांच्या अनेक चमूंनी बंगालमधील गावांमध्ये जाऊन प्रचार केला. तेथे बैठका घेतल्या आणि लोकांना समजावून सांगितले, ‘ही शेवटची संधी आहे. आता झाले नाही, तर पुन्हा कधीच होणार नाही. बंगालचा बांगलादेश होईल.’ त्यांनी हे काम गुप्तपणे केले. संतांचा समाजावर पुष्कळ मोठा प्रभाव आहे. त्यामुळे बंगालने या वेळी पूर्णपणे हिंदुत्वाला समोर ठेवून मतदान केले.
– एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेता, बंगाल
३. महिलांवरील अत्याचारांमुळे लोकांमध्ये आक्रोश
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या राजवटीत कितीतरी अत्याचार झाले. ते करणारे बहुतांश धर्मांध मुसलमान होते. काही वेळा त्यात हिंदूंचाही समावेश होता. अनेकांच्या हत्या करण्यात आल्या आणि महिलांवर अत्याचार झाले. या सर्व घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवले गेले नाहीत. त्यावर बंदीच होती. तक्रार करण्यासाठी जाणार्यांना पोलीस थांबवून परत पाठवून देत. ‘आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालया’तील महिला आधुनिक वैद्यावर (डॉक्टरवर) झालेला अत्याचार आणि तिची हत्या बंगालचे लोक सहन करू शकले नाहीत. बंगाली हिंदू भावनाप्रधान असतात. त्यांच्यावर इतके अत्याचार झाले की, बंगालमध्ये प्रचंड जनआक्रोश उसळला. संधी मिळेल, तेव्हा स्वतःची शक्ती दाखवायची, हे मतदारांनी मनातल्या मनात ठरवून टाकले होते.
४. ‘ममता राज’चा भ्रष्टाचार !
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या नोकर्या हिसकावून घेतल्या होत्या. ज्या नागरिकांनी सरकारी नोकरीच्या परीक्षा दिल्या, त्यांना नोकर्या मिळाल्याचे घोषित झाले. त्यांची नावे सूचीतही होती; पण तृणमूलच्या लोकांनी लाच घेऊन सूची पालटली आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांना नोकर्या दिल्या. त्या विरोधात नागरिकांचे मोठे आंदोलन झाले. शिक्षकांसह विविध व्यवसायांतील लोकांनीही जोरदार आंदोलन केले. तृणमूलचे जे पदाधिकारी अथवा कार्यकर्ते झोपड्यांमध्ये रहात होते, ते आता मोठ्या आलिशान महालांमध्ये रहात आहेत. लोकांनी हे सर्व शांतपणे पाहिले; पण ते बोलले नाहीत. ते बोलले असते, तर तृणमूल काँग्रेसच्या लोकांचे ते शत्रू बनले असते. त्यामुळेच हा चमत्कार घडला.

५. राजकीय विचारांनी चालणारी बंगाली जनता
बंगालमधील लोक राजकीय दृष्टीकोनातून पुष्कळ विचार करतात. ही येथील सर्वांत मोठी समस्या आहे. इतर राज्यांमधील निवडणुका पाहिल्या, तर त्या आपल्याला समाजायला ३-४ दिवस लागतात; पण नंतर त्या समजत नाहीत. बंगालचे लोक प्रतिदिन राजकारण खेळतात. हा त्यांना लागलेला एक रोगच आहे. बंगालमध्ये पूर्वी माकप सत्तेत होता, तेव्हा या राजकारणाचा प्रभाव अधिक होता. माकपच्या राजवटीत लोक नास्तिक बनले. जेव्हा तृणमूल काँग्रेस सत्तेत आली, तेव्हा लोक परत धर्माकडे वळू लागले. या वेळी लोकांना कळून चुकले होते की, त्यांना आता काहीतरी पालट करावेच लागतील; पण त्याविषयी कुणालाच ठाऊक नव्हते. ते नातेवाइकांमध्ये आपापसांत चर्चा करत असतीलही; पण बाहेर कुणाशीच काही बोलत नव्हते. त्यामुळे हा चमत्कार घडल्याचे दिसत आहे.
६. बंगालमधील निवडणुकीनंतरचा हिंसाचार
या निवडणुकीच्या वेळी एक चांगली गोष्ट घडली. निवडणुकीच्या पूर्वी महिलांवरील अत्याचार किंवा हत्या झाल्या नाहीत. आश्चर्याचे म्हणजे निवडणुकीनंतर आणि मतमोजणीनंतर ६ लोकांच्या हत्या झाल्या. हत्या झालेल्यांपैकी ४ लोक भाजपचे होते. भाजपचे मुख्य नेते आणि बंगालचे नवे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांचे स्वीय साहाय्यक चंद्रनाथ रथ चारचाकीने जात होते, तेव्हा मारेकर्यांनी त्यांना घेरले अन् त्यांच्यावर १० ते १६ गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि चालक गंभीर घायाळ झाला. यामागे व्यावसायिक मारेकरी असल्याचे कळते. उत्तर २४ परगणा येथेच शुभेंदु यांच्या आणखी एका व्यक्तीवर ३ गोळ्या झाडण्यात आल्या; पण तो वाचला. हिंदूंनी ज्या दृष्टीकोनातून मतदान केले, ते अकल्पनीय आहे. या वेळी कदाचित् मुसलमानांची मते थोडी विभागली गेली असतील; कारण तेही थोडे नाखूश होते.
७. …आता हिंदूंचे बळकट संघटन आवश्यक !
आता हिंदुत्वाचा विषय जनमानसांत अधिक शक्तीशाली केला पाहिजे. लोक हिंदुत्वाकडे वळत आहेत. त्यामुळे त्यांना धर्माच्या मार्गावर आणणे सोपे आहे. दक्षिण २४ परगणामधील पाणीहाटी शहरामध्ये इतर लोकांप्रमाणेच धर्मांध मुसलमानांनी हिंदु वस्तीत बिर्याणीचे दुकान उघडले होते. ते हिंदूंनी तोडून टाकले. दक्षिण २४ परगणा भागात एका मुसलमान नेत्याने एका हिंदूच्या आलिशान घरावर ताबा मिळवला होता. ७ मे या दिवशी ते मुक्त करण्यात आले. तृणमूल काँग्रेसच्या सत्ताकाळात आसनसोलमधील दुर्गा मंदिर बंद करण्यात आले होते, ते आता परत उघडण्यात आले. लोक हिंदुत्वाकडे वळले आहेत. त्यामुळे त्यांना अधिक संघटित केले पाहिजे. जेथे कुठे धर्मांधांनी हिंदूंच्या मालमत्तेवर ताबा मिळवला आहे, तेथे प्रत्येकाने विरोध करण्याचे धाडस दाखवले पाहिजे आणि ते तसे करतही आहेत. अन्यथा हिंदुत्वाचे वारे दबून जायला नको. याकडे आता लक्ष देणे अधिक आवश्यक आहे.
बंगालच्या हिंदूंसाठी हे परिवर्तन ‘न भूतो न भविष्यति’, म्हणजे ‘असे यापूर्वी घडले नाही आणि पुढेही घडणार नाही’, अशा प्रकारचे आहे. मी स्वतः गावोगावी जात आहे. त्यामध्ये असे दिसून आले की, हिंदूंवर धर्मांधांचे वर्चस्व झाले असते. तसे होऊ नये, यासाठी त्यांनी हा पालट घडवला. बंगालमध्ये हिंदुत्वाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे त्यांना अधर्माच्या विरोधात संघटित करणे आवश्यक आहे.’
– एक प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेता, बंगाल (७.५.२०२६)

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !