‘४ मे २०२६ या दिवशी आसाम, बंगाल, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळम् या ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाले. बंगालमध्ये मागील १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा पराभव होऊन भारतीय जनता पक्षाने २०६ जागांवर विजय मिळवला. हा ऐतिहासिक विजय बंगालचे राजकारण, कायदा-सुव्यवस्था, अर्थकारण, राष्ट्रीय सुरक्षा आणि संस्कृती आदींच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच; पण त्यासह तो आध्यात्मिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. या विजयाचा आध्यात्मिक पैलू जाणून घेऊया.

१. आध्यात्मिक दृष्टीने विचार करतांना चेतनेचा (जाणिवेचा) स्तर विचारात घेणे आवश्यक !
एखाद्या परिस्थितीचा आध्यात्मिक दृष्टीने विचार करतांना तेथे कार्यरत असलेल्या चेतनेचा (जाणिवेचा) स्तर विचारात घेतला जातो. चेतनेचा स्तर जितका उच्च असेल, तितकी सात्त्विकता अधिक असते. परिणामी सत्य, न्याय, प्रेम, सद्भाव, त्याग आदी उच्च मूल्यांची जोपासना होते. ही मूल्ये उन्नतीकारक असतात. याउलट चेतनेचा स्तर जितका कनिष्ठ असेल, तितकी तामसिकता अधिक असते. परिणामी स्वार्थ, भेद, संकुचितता, असत्य, अधर्म आदी कनिष्ठ मूल्यांना महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे हिंसा, अराजकता, भ्रष्टाचार, सत्तांधता, हुकूमशाही इत्यादी बळावून विनाश निकट येतो.
२. तृणमूल काँग्रेस हा कनिष्ठ स्तरावरील चेतनेने युक्त पक्ष

बंगालमधील तृणमूल काँग्रेस हा कनिष्ठ स्तरावरील चेतनेने युक्त पक्ष आहे. कनिष्ठ स्तरावरील चेतनेची ‘सत्ता, पैसा, स्वार्थ, विभाजन, हिंसा’ इत्यादी ही त्याची मूल्ये आहेत. पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याकडे स्वतःची अशी विचारसरणी नाही, तसेच राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांच्याकडे व्यापक दृष्टी (vision) नाही. केवळ ‘सत्ता हस्तगत करणे’, एवढेच त्यांचे उद्दिष्ट असल्याचे दिसून येते.
२ अ. तृणमूल काँग्रेसने मुसलमानांचे सातत्याने केलेले लांगूलचालन : सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष कोणत्याही थराला जातो. गेल्या १५ वर्षांच्या काळात या पक्षाने मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी त्यांचे सतत लांगूलचालन केले. त्यामुळे मुसलमानांचे हिंदूंवरील अत्याचार पुष्कळ वाढले. बंगालमधील मुसलमानांची लोकसंख्या आज ३० टक्के असून तेथील अनेक जिल्हे मुसलमानबहुल झाले आहेत. एवढेच नव्हे, तर तृणमूल काँग्रेसने लाखो घुसखोर बांगलादेशी मुसलमानांची मते मिळण्यासाठी त्यांना आश्रय देण्यासह खोटी ओळखपत्रे दिली आहेत. वर्ष २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पात तृणमूल काँग्रेसने ‘अल्पसंख्यांक विकास आणि मदरसा शिक्षण’ यांसाठी ५ सहस्र कोटी रुपयांचे, तर तंत्रज्ञान विकासासाठी केवळ १५५ कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे.
२ आ. निष्पक्ष मतदान होऊ न देणारी तृणमूल काँग्रेस ! : तृणमूल काँग्रेसचे गुंड कार्यकर्ते हे लोकांमध्ये दहशत निर्माण करून जणू समांतर सरकार चालवतात. मतदानाच्या काळात ते प्रचंड हिंसाचार घडवतात. प्रतिस्पर्धी पक्षाला मते मिळू नयेत, म्हणून ते मतदारांना घरातून बाहेर पडू देत नाहीत. त्याऐवजी ते खोटे मतदान घडवून आणतात. त्यांना मत न देणार्यांना ते मारहाण करतात. तृणमूलच्या गुंड कार्यकर्त्यांनी आतापर्यंत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांची हत्या केली आहे.
२ इ. बंगालचा विकास न साधणारी तृणमूल काँग्रेस ! : बंगाल विकासामध्ये मागे आहे. गेल्या १५ वर्षांत ६ सहस्रांहून अधिक आस्थापनांनी त्यांची मुख्यालये बंगालमधून इतर राज्यांत स्थलांतरित केली आहेत. राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण अधिक असून असे असण्यात बंगालचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. कर्जासाठी घेतलेल्या निधीची भांडवलात गुंतवणूक करण्याऐवजी कल्याणकारी योजनांची पूर्ती करण्यासाठी तो पैसा वापरला जातो. तृणमूलचे कार्यकर्ते नवीन उद्योग उभारण्यात अडचणी आणून खंडणी वसुली करतात. परिणामी बंगालमधील तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यांत जावे लागते. बंगाल हा दरडोई उत्पन्नामध्ये देशात २३ व्या स्थानावर आहे. (राज्यानुसार दरडोई उत्पन्नाची सूची : १. सिक्कीम, २. गोवा, ३. देहली, ४. चंडीगड, ५. तेलंगाणा, ६. कर्नाटक, ७. हरियाणा, ८. तमिळनाडू, ९. गुजरात, १०. महाराष्ट्र, ११. केरळम्, १२. अंदमान-निकोबार, १३. उत्तराखंड, १४. पुद्दुच्चेरी, १५. हिमाचल प्रदेश, १६. मिझोराम, १७. आंध्रप्रदेश, १८. अरुणाचल प्रदेश, १९. पंजाब, २०. त्रिपुरा, २१. जम्मू-काश्मीर, २२. राजस्थान, २३. बंगाल, २४. नागालँड, २५. ओडिशा, २६. आसाम, २७. मध्यप्रदेश, २८. मेघालय, २९. छत्तीसगड, ३०. मणीपूर, ३१. झारखंड, ३२. उत्तरप्रदेश आणि ३३. बिहार) (साभार : ‘विकिपीडिया’चे संकेतस्थळ)
२ ई. ममता बॅनर्जी यांचा राष्ट्र-धर्मद्रोह ! : ममता बॅनर्जी यांनी हिंदुत्वाला सतत विरोध केला आहे. त्यांचा ‘जय श्रीराम’ या घोषणेला विरोध आहे, तसेच त्यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीला विरोध केला होता. यांसह केंद्रशासनाच्या प्रत्येक राष्ट्रहितैषी निर्णयाला ममता यांचा विरोध आहे, मग ते नागरिकत्व सुधारणा विधेयक असो, वक्फ कायद्यातील सुधारणा असो किंवा घुसखोरांना भारतातून हाकलणे असो. थोडक्यात ‘देशाची हानी झाली, तरी चालेल; परंतु आमची सत्ता टिकायला हवी’, अशी त्यांची मानसिकता आहे. ‘दुसर्यांचे अहित करून स्वतःचे हित साध्य करणे’, ही आसुरी चेतना आहे.
३. तृणमूल काँग्रेसचा पराभव, म्हणजे आसुरी चेतनेचा पराभव !
वर्ष २०२६ मधील निवडणुकीत बंगालमध्ये तृणमूलचा झालेला पराभव, म्हणजे आसुरी चेतनेचा पराभव आहे. हा अधर्म आणि असत्य यांचा पराभव आहे. तृणमूल काँग्रेस वर्ष २०११ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी ३ दशके बंगालमध्ये साम्यवाद्यांचे सरकार होते. ते सरकारही विकासविरोधी, हिंदुद्रोही, अत्याचारी आणि हिंसक होते. त्यामुळे गत ५० वर्षे बंगाली जनतेने सुशासन अनुभवलेले नाही.
४. बंगालमध्ये भाजपचे राज्य असणे, हे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक !
आता बंगालमध्ये भाजपच्या रूपात चांगल्या चेतनेला कार्य करण्यासाठी वाव मिळणार आहे. भाजप हा राष्ट्रवादी पक्ष आहे. राष्ट्रीय सुरक्षेविषयी त्याला गांभीर्य आहे. भारताच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीची त्याला जाणीव आहे. भाजपमध्ये घराणेशाही नाही, तसेच सत्ता मिळवण्यासाठी तो हिंसेचा मार्ग अवलंबत नाही. भाजपचे नेतृत्व हे संस्कृती आणि विकास यांचा समन्वय साधत असल्याचे दिसून येते.
थोडक्यात साम्यवादी आणि तृणमूल काँग्रेस यांच्यापेक्षा भाजप हा चेतनेच्या स्तरावर निश्चितच वरच्या पायरीवर आहे. त्यामुळे बंगालमध्ये भाजपचे राज्य येणे, हे देशाची सुरक्षा, बंगालमधील हिंदूंचे रक्षण आणि बंगालचा विकास यांसाठी अत्यावश्यक आहे.
५. कनिष्ठ स्तरावरील मूल्ये बाळगणार्या विचाराधारा येणार्या काळात शक्तीहीन होणार असणे
सध्याचा काळ परिवर्तनाचा आहे. सामाजिक चेतनेला कनिष्ठ स्तरातून वरच्या स्तरावर जाण्याचे वेध लागले आहेत. समाजातील जे घटक, पंथ, राजकीय पक्ष आणि विचारधारा इत्यादी कनिष्ठ स्तरावरील मूल्ये बाळगतात अन् विभाजन, गुन्हेगारी, हिंसा, अन्याय आणि अधर्म यांना थारा देतात, ते पुढील काळात शक्तीहीन होणार आहेत. याउलट जे श्रेष्ठ मूल्यांचा पुरस्कार करतात आणि एकता, न्याय, सद्भाव, सत्य अन् धर्म यांचे पोषण करतात, त्यांचा उत्कर्ष होणार आहे. हे केवळ भारताच्या संदर्भात नसून संपूर्ण जगाच्या संदर्भात आहे; कारण कालपुरुष त्याची कूस पालटत आहे. नवीन स्तराची जागतिक चेतना जन्म घेत आहे. नव्या युगाचा आरंभ होत आहे !’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.५.२०२६)
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी