वारकर्‍यांनी पाणी वापरासाठी कालव्‍याच्‍या घाटांचा उपयोग करावा ! – जलसंपदा विभागाचे आवाहन

जलसंपदा विभागाने आवश्‍यक ती काळजी घेतली आहे; पण वारकर्‍यांनी आंघोळ किंवा कपडे धुण्‍यासाठी कालव्‍यात न उतरता आवश्‍यकता वाटल्‍यास घाटांचा उपयोग करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

वारी : अध्‍यात्‍माचा प्रवास !

वारी वर्षातून एकदाच असते. त्‍यामुळे सततच ही आध्‍यात्मिक ऊर्जा मिळण्‍यासाठी, म्‍हणजे अध्‍यात्‍माचा हा प्रवास अखंड चालू ठेवण्‍यासाठी आणि आनंदी जीवन जगण्‍यासाठी तरुणांनी प्रतिदिन योग्‍य साधना करणे आवश्‍यक आहे.

वारकरी विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळेच माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट !

वारकरी संप्रदायाच्या भावनेइतकाच संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व्यवस्थापनाचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊनच यंदा नियोजन करण्यात आले. प्रतिवर्षी पालखी प्रस्थान सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन सोहळ्याच्या सर्व संबंधितांशी सतत विचारविनिमय करून संस्थान कमिटीने ..

पैठण येथील संतपिठात १५० विद्यार्थी, १० प्राध्‍यापक; मात्र उपस्‍थित कुणीही नाही !

एका पहाणीत संतपिठाच्‍या वर्गात एकही विद्यार्थी दिसला ना प्राध्‍यापक ! संतपीठाचे समन्‍वयक डॉ. प्रवीण वक्‍ते यांनी प्राध्‍यापक प्रतिदिन येत असल्‍याचा दावा केला

विदेशी पाहुण्‍यांनी घेतला वारीचा आनंद !

जी-२० ‘डिजिटल अर्थव्‍यवस्‍था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्‍यात दाखल झालेला आहे. या कार्यगटातील विदेशी पाहुणे पालखी सोहळ्‍याचा आनंद घेण्‍यासाठी सहभागी झाले होते.

आषाढी यात्रेच्‍या निमित्ताने दर्शन रांगेत यंदा १२ छतांची उभारणी !

यंदाच्‍या वर्षी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीकडून दर्शनरांगेत एकूण १२ छते उभारण्‍यात येणार आहेत. या छतांमुळे एकाच वेळी अनुमाने १२ सहस्र भाविकांचे ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होईल.

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पादुकांच्‍या स्नानाची सिद्धता पूर्ण !

पुण्‍यातून निघाल्‍यानंतर माऊलींच्‍या पादुकांच्‍या पहिल्‍या स्नानाची सिद्धता करण्‍यात आली आहे. सातारा जिल्‍ह्याच्‍या सीमेवरील निरा नदीच्‍या श्री दत्त घाटावर माऊलींच्‍या पादुकांना स्नान घालण्‍यात येते. यंदा १ या दिवशी स्नान होणार आहे.

वारकर्‍यांच्या बरोबरीने शहरातील विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी !

पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात.

पाऊले चालती पंढरीची वाट

वारकरी संप्रदायात आषाढी वारीला महत्त्वाचे स्‍थान आहे. सर्व संत वारकरी होते. संत तुकाराम महाराज म्‍हणतात, ‘होय होय वारकरी । जाय जाय तूं पंढरी  ।’ या वारीला कशासाठी जायचे ? वारी ही सामूहिक (समष्‍टी) साधना आहे. त्‍यात संयम आणि शिस्‍त शिकायला मिळते, अहंकाराचा नाश होतो आणि परमार्थातील प्रगतीला गती मिळते.

हरिनामाच्‍या अखंड जयघोषात संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊली यांच्‍या पालखीचे पंढरपूरच्‍या दिशेने प्रस्‍थान !

वारकर्‍यांच्‍या टाळ मृदुंगाच्‍या गजरात ११ जून या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्‍थान सोहळा पार पडला. इंद्रायणीच्‍या काठावर सहस्रों वारकरी आलेे होते.