लव्ह जिहादच्या घटनेचा निषेध करण्यासाठी नागोठणे (जिल्हा रायगड) येथे आज बंद !

नागोठणे (जिल्हा रायगड) – येथील मंजर जुईकर या धर्मांधाने केलेल्या २ लव्ह जिहादच्या घटनांच्या निषेधार्थ नागोठणे येथील हिंदुत्वनिष्ठांनी २८ डिसेंबर या दिवशी नागोठणे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मरुड येथील एका पायल जैन या विवाहित महिलेला लव्ह जिहादमध्ये फसवून तिच्याकरवी तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून त्याचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या संदर्भात तक्रारही प्रविष्ट आहे, तसेच गुन्हाही नोंद आहे. सध्या आरोपी फरार आहेत. हिंदु जनजागृती मंच, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, जैन समाज आदींचा या बंदला पाठिंबा आहे. सकल हिंदु समाजाच्या वतीने हे बंदचे आवाहन लव्ह जिहाद, धर्मांतर आदींचा निषेध करण्यासाठी करण्यात आले आहे.