राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांना ‘सातारा भूषण’ पुरस्कार प्रदान !

राष्ट्रीय कीर्तनकार समर्थभक्त ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांना वर्ष २०२० चा ‘सातारा भूषण’ पुरस्कार श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्रीसमर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थभक्त योगेशबुवा रामदासी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

‘भारत बंद’च्या आंदोलनात सहभागी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले कह्यात

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संयुक्त कामगार समितीच्या वतीने ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर २६ मार्च या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले होते.

परमबीर सिंह देहलीत कुणाला भेटले ? – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

एखादा वरिष्ठ अधिकारी जेव्हा आरोप करतो, तेव्हा त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. त्यामुळे राष्ट्र्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे; पण जेव्हा हे पत्र वाचले, तेव्हा असे लक्षात आले की, त्यामध्ये दिनांकाचा घोळ झालेला आहे.

राज्यात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी घोषित ! – मुुख्यमंत्री

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने येत्या रविवारपासून म्हणजे २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी घोषित करण्याचा निर्णय मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भातील सूचना त्यांनी दिल्या आहेत

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या !

अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या गुन्हेगाराला कठोर शासनच करायला हवे !

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याची नाशिकच्या कारागृहात ठेवण्याची मागणी

पत्रकारिता करतांना ज्यांचे घोटाळे बाहेर काढले, ज्यांच्या विरोधात बातम्या दिल्या, त्यातील काही आरोपी नगर आणि येरवडा कारागृहात आहेत. मलाही त्याच ठिकाणी ठेवले, तर माझ्या जिवाला धोका होऊ शकतो…..

माथाडी कामगार नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांची नवी मुंबई येथे ३९ वी पुण्यतिथी साजरी

माथाडी कामगार संघटनेचे (संस्थापक) स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची ३९ वी पुण्यतिथी २३ मार्च या दिवशी नवी मुंबईतील माथाडी भवन येथे साजरी करण्यात आली. यानिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता.

वर्ष २०१७ पासून राज्यात अमली पदार्थांवरील कारवाईची एकूण ७७५ प्रकरणे नोंद

केवळ गुन्हे नोंदवून अमली पदार्थ व्यवसाय बंद होणार नाही. त्यासाठी कायदेही तसेच सक्षम बनवावे लागतील

गोव्यात खाणी चालू करण्यावर विधानसभेतील सर्व सदस्यांचे एकमत

खाण व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू करण्यास शासनाला अपयश आले आहे.