उन्हाळ्यात कृष्णा नदी कोरडी पडणार नाही, यासाठी महापालिका कोयना प्रशासनाशी समन्वय साधू ! – दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

महापौर पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी अल्प झाल्याने सांगलीकरांना पाणीटंचाईचे संकट भेडसावते. पालकमंत्र्याच्या समवेतच्या बैठकीत कृष्णेची पातळी अल्प होताच तात्काळ कोयनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे.

सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेणे, ही सरकारची चूक ! – अबू आझमी

सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता. त्यासाठी मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सांगितले होते; पण माझे ऐकले गेले नाही. सरकारने ही मोठी चूक केली असे वक्तव्य अबू आझमी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

१० वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाविषयी प्रगती अहवाल सादर करण्याचा न्यायालयाचा आदेश

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अन्यत्र २५ किलोमीटरचे काम १८ घंट्यांमध्ये पूर्ण करत असेल, तर मुंबई-गोवा महामार्गाविषयीच भेदभाव का केला जात आहे ? पथकर वसुलीसाठी मात्र तत्परतेने पावले उचलली जात आहेत’, असे अधिवक्ता पेचकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

उंब्रज (जिल्हा सातारा) परिसरातील २ टोळ्यांवर सीमापारीची (तडीपारीची) कारवाई !

जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, शिराळा, वाळवा तालुक्यातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका सीमेतून १ वर्षासाठी सीमापार केल्याचे आदेश दिले आहेत. बन्सल यांनी सातारा जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून १० प्रस्तावातील ४१ जणांचे सीमापारीचे आदेश दिले आहेत.

अभ्यासासाठी लागणारा ‘स्मार्टफोन’ गरिबीमुळे घेऊ शकत नसल्याने इयत्ता १० वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

एकीकडे ‘ऑनलाईन’ शिक्षण देणारे शिक्षण खाते विद्यार्थ्यांच्या मूलभूत अडचणीही सोडवू शकत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागते. सरकारी यंत्रणांसाठी यापेक्षा लज्जास्पद गोष्ट दुसरी कुठली असू शकते.

विशाळगडाच्या समस्येच्या संदर्भात पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे छत्रपती संभाजीराजे यांचे आश्‍वासन

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्या यांत लक्ष घालून पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे आश्‍वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले.

कुंभमेळ्यामध्ये दिवसाला कोरोनाच्या ५० सहस्र चाचण्या करण्याचे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे आदेश

जिल्ह्याच्या सर्व सीमांवर वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कुंभमेळ्याला येणार्‍या सर्व भाविकांचा ७२ घंटे अगोदरचा कोरोनाचा ‘निगेटिव्ह’ अहवाल पडताळणी करूनच त्यांना जिल्ह्याच्या आत प्रवेश दिला जाणार आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिकेने अवैध मांसविक्री करणार्‍या दुकानांवर कारवाई करण्याच्या दिलेल्या आश्‍वासनानंतर गोरक्षकांचे आमरण उपोषण स्थगित

गोरक्षकांच्या उपोषणानंतर अवैध मांसविक्रीवर कारवाई करण्याचे आश्‍वासन देणारे प्रशासन सर्व यंत्रणा हाताशी असतांना कारवाई का करत नाही ?