‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या सदस्यांनी घेतली छत्रपती संभाजीराजे यांची भेट

कोल्हापूर, १ एप्रिल (वार्ता.) – विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरावस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्या यांत लक्ष घालून पुरातत्व विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले.
‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने खासदार छत्रपती संभाजीराजे यांना १ एप्रिल या दिवशी निवेदन देऊन त्यांना सदरचा विषय अवगत केला. तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिले. या वेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, सदस्य सर्वश्री चंद्रकांत बराले, राजू यादव, शरद माळी, बाबासाहेब भोपळे, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत विशाळगडावर ६४ अतिक्रमणे झाल्याचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘‘तुम्ही या विषयाचा चांगला अभ्यास केला आहे. काही दिवसांपूर्वी मी विशाळगड येथे भेट दिली होती, तेव्हा तेथे पुष्कळ अस्वच्छता होती. या प्रकरणी मी स्वत: लक्ष घालीन.’’
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा