अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील ‘मंगळग्रह सेवा संस्थे’कडून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकार्‍यांना १ लाख रुपयांचा धनादेश !

जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था ही केवळ एक धार्मिक संस्था नसून सामाजिक जाणिवेचे भान ठेवणारी संस्था आहे.

राहुरी (नगर) येथील पत्रकार आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या

राहुरी (नगर) येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.

कुर्ला (मुंबई) येथे गुलाब इस्टेटमध्ये भीषण आग

कुर्ला येथील गुलाब इस्टेटमध्ये स्पेअर पार्ट्सच्या गोदामांना भीषण आग लागली. आगीचे कारण कळू शकले नाही.

अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी शिवसेनेशी संपर्क साधावा ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोरोना लढ्यासाठी शिवसेनेची ‘माझे शहर-माझी जबाबदारी’ हेल्पलाईन मोहीम

पुणे महानगर परिवहन मंडळाची सेवा सामान्यांसाठी बंद ठेवल्यामुळे नागरिकांचे हाल !

राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या नियमानुसार सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बाजारपेठा आणि विविध आस्थापनांना चालू ठेवण्यास अनुमती दिली आहे. तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्रीला संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला.

खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याकडून नगर येथील वाळू तस्करीसंबंधीचे पुरावे एकत्र

कारवाई न झाल्यास उपोषण करण्याची चेतावणी

बीड येथे एकाच चितेवर कोरोनाने मृत्यू झालेल्या ८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ८ जणांवर एकाच चितेवर अंत्यविधी करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या पथकाने एकाच रुग्णवाहिकेतून हे आठही मृतदेह स्मशानभूमीत आणले.

इयत्ता ९ वी आणि ११ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय !

इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा मात्र ‘ऑफलाईन’च होणार

कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून येणार्‍यांसाठी ‘कोरोना निगेटिव्ह’ अहवाल बंधनकारक असण्याविषयीचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश मागे !

कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून कोल्हापूर जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी ‘कोरोना निगेटिव्ह’ (‘आर्.टी.पी.सी.आर्.’ अथवा ‘ऍन्टीजेन’) अहवाल असणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ६ एप्रिल या दिवशी काढला होता.

महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडून अन्य दुकाने बंदच रहाणार ! – नितीन कापडणीस, आयुक्त

शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधानुसार महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवेची दुकाने सोडून अन्य दुकाने बंदच रहातील. रस्त्याऐवजी खुल्या भूखंडावर भाजी विक्री करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे, असे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.