कोल्हापूर, ७ एप्रिल – कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून कोल्हापूर जिल्ह्यात येणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी ‘कोरोना निगेटिव्ह’ (‘आर्.टी.पी.सी.आर्.’ अथवा ‘ऍन्टीजेन’) अहवाल असणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ६ एप्रिल या दिवशी काढला होता. या आदेशामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने ७ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी यांनी हा आदेश मागे घेत असल्याचे घोषित केले. तथापि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सध्याच्या शासनाच्या निर्देशानुसार ‘स्वॅब’ पडताळणी, अलगीकरण आणि विलगीकरण यांची कार्यवाही चालू असेल, असेही त्या आदेशात नमूद केले आहे.