शिवसेना नेते यशवंत जाधव यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स !

शिवसेना नेते यशंवत जाधव यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावला आहे. ‘फेमा’ कायद्याअंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी त्यांना हा समन्स बजावण्यात आला आहे. यामध्ये जाधव यांच्या विदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरचे संजय पवार यांना शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी !

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या नावाची घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबई येथून केली आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.

औरंगाबाद विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ असे नामकरण करण्याची मागणी !

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची १७ मे या दिवशी भेट घेतली.

संभाजीनगर येथील औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त करण्याची मनसेची मागणी !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संभाजीनगर येथील औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त करण्याची मागणी शिवसेनेकडे केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी करण्यात आली आहे.

भाजपच्या ५ वर्षांच्या सत्ताकाळात फडणवीस यांनी ‘औरंगाबादचे संभाजीनगर’ नामकरण का केले नाही ? – चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते

चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळी मी ‘औरंगाबादचे संभाजीनगर’ नामांतर करण्यासाठी फडणवीस यांच्याकडे विनंती करायचो; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

शिवसेनेने संभाजीनगर नावाचा ठराव मांडल्यास संमतीसाठी प्रयत्न करू ! – भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

शिवसेनेने विधानसभेत औरंगाबादऐवजी ‘संभाजीनगर’ नावाचा ठराव घ्यावा आणि केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव संमत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी १४ मे या दिवशी येथे केले.

आदित्य ठाकरे १० जून या दिवशी अयोधेला जाणार ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे १० जून या दिवशी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे खासदारही असतील, अशी माहिती संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यांवर आंदोलन करण्यासारखी परिस्थिती नाही ! – खासदार संजय राऊत

सर्वांनी अनुमती घेतली असल्याने कारवाईची आवश्यकता नाही. हाच नियम मंदिर, चर्च आदी सर्वांना लागू आहे, असे विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले.

राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या भोंग्यांविषयीच्या भाषणाचा जुना व्हिडिओ प्रसारित !

या व्हिडीओद्वारे राज ठाकरे यांनी शिवसेनेला भोंग्यांविषयी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे भूमिका घेण्याचे आवाहन केले !