भटक्या कुत्र्यांमुळे महापालिका क्षेत्रात कुणाचा तरी जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे का ? – नितीन शिंदे, माजी आमदार

नागरिकांच्या जिवाशी खेळणारे असंवेदनशील महापालिका प्रशासन !

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यापार अन् उद्योग व्यवसाय पूर्ववत् चालू करा ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना ११ जून या दिवशी दिले.

कोरोनासारख्या संकटकाळात स्थिर रहाण्यासाठी साधना आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनासारख्या संकटकाळात मनाची स्थिती स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी नुकतेच एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त !

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. पहिल्या टप्प्यात २०० हून अधिक प्रस्तावांमधून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पहिल्या टप्प्यात निवड झाली.

कोरोना लसीकरण झालेल्या विक्रेत्यांनाच महापालिकेकडून घरपोच विक्री करण्यासाठी ‘पास’

ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा अल्प आहे, त्यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी ‘निगेटिव्ह’ असेल त्यांनाच घरपोच विक्रीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पास’ देण्यात येणार आहे.

सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी घोषित करण्यापूर्वी कोरोनाच्या पडताळणीचा अहवाल तात्काळ देणे, छोट्या घटकांना आर्थिक सहकार्य देणे यांसह अन्य गोष्टींचे नियोजन करावे ! – आमदार सुधीर गाडगीळ

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनभावनेचा विचार आणि कोरोनाचा प्रतिबंध यातील सुवर्णमध्य साधणारा निर्णय सरकारने घ्यावा.

औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना लस द्या ! – भाजप उद्योग आघाडीचे निवेदन

या मागणीचे निवेदन भाजप उद्योग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश आरवडे, नाना कांबळे उपस्थित होते.

सांगलीत व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्ष यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजप आमदार  सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा सहभागी झाले होते.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध काटेकोरपणे पाळा ! – जयंत पाटील, पालकमंत्री

पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

सांगली महापालिका क्षेत्रात ५ खासगी रुग्णालये कोरोना रुग्णालय म्हणून चालू करा ! – नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त

सांगलीतील मेहता रुग्णालय आणि कल्लोळी रुग्णालय, मिरजेतील भारती, वॉनलेस आणि सेवासदन या रुग्णालयांचा समावेश आहे. ही रुग्णालये शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट आहेत.