सांगली, १२ ऑक्टोबर – गणेशनगर भागात ११ ऑक्टोबर या दिवशी दुपारी विद्युत् वाहिनीमधून अचानक आलेल्या विजेच्या उच्च दाबामुळे ६०० घरांमधील दूरचित्रवाहिनी संच, भ्रमणभाष, शीतकपाट यांसह अन्य विद्युत् उपकरणे जळली आहेत. ऐन नवरात्रीत वीजवितरण आस्थापनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठी आर्थिक हानी सोसावी लागली आहे. या प्रभागाचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वीज आस्थापनाच्या अधिकार्यांना बोलावून सदरची घटना निदर्शनास आणून दिली. मंगेश चव्हाण आणि परिसरातील नागरिकांनी ‘पंचनामा करून तात्काळ हानीभरपाई मिळावी’, अशी मागणी केली आहे. यानंतर वीजवितरण आस्थापनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.