मिरज, ३ ऑक्टोबर – मिरजेत सांगली महापालिकेकडून ‘आझादीका अमृतमहोत्सव’ कार्यक्रम पार पडला. या वेळी शाहीर देवानंद माळी यांनी त्यांच्या पथकासह देशाच्या स्वातंत्र्य संग्रामावर आधारित पोवाडा सादर केला. या निमित्ताने बालगंधर्व नाट्यगृहात स्वच्छता आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती-संस्था यांचा गौरव करण्यात आला. या वेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती निरंजन आवटी, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका सौ. संपदा पाटणकर, उपायुक्त चंद्रकांत आडके, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत प्रास्ताविक डॉ. रवींद्र ताटे यांनी केले, तर सूत्रसंचालन दीपक चव्हाण यांनी केले.