कृतज्ञताभाव दर्शवणारी पौराणिक काळातील उदाहरणे !

१. चंद्रदेवाचा शिवाविषयी निस्सीम कृतज्ञताभाव

सुश्री (कु.) मधुरा भोसले

चंद्रदेवाला प्रजापति दक्षाने क्षय होण्याचा शाप दिला होता. त्यातून मुक्त होणासाठी चंद्रदेवाने प्रभास क्षेत्री शिवाची आराधना केली. त्यानंतर शिवाने प्रसन्न होऊन चंद्रदेवाला शापमुक्त केले. तेव्हा चंद्रदेवाने शिवाच्या चरणी कृतज्ञताभावाने कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा निस्सीम कृतज्ञताभाव पाहून शिवाने चंद्राला पूर्णपणे शापमुक्त करण्यासाठी त्याला स्वत:च्या मस्तकावर धारण केले.

२. राजा शंखच्या मनात भगवंताविषयी कृतज्ञताभाव

जेव्हा राजा शंखने नारदमुनींना ‘‘मला भगवंताचे दर्शन कधी होणार ?’’, असा प्रश्न विचारला, तेव्हा नारदमुनी म्हणाले, ‘‘तुला सहस्रो वर्षानंतर भगवंताचे दर्शन होईल.’’ राजा शंख निराश झाला नाही. त्याला वाटले, ‘सहस्रो वर्षांनी तरी मला भगवंताचे दर्शन होणार आहे.’ त्याच्या मनात भगवंताविषयी अत्यंत कृतज्ञताभाव जागृत होऊन तो आनंदाने नाचू लागला.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.