जालना येथे ट्रकची धडक बसून रुग्णालयातून पळून जाणारा कोरोनाबाधित रुग्ण ठार !

जालना – येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असलेले रुग्ण राजू गायकवाड (वय ४८ वर्षे) सामान्य रुग्णालयातून कुणालाही न सांगता बाहेर पडले. ते रस्त्यावरून जात असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जालना-संभाजीनगर रस्त्यावरील त्रिमूर्तीजवळ ४ मे या दिवशी सकाळी ११.३० वाजता घडली. कोरोनाबाधित राजू यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार चालू होते. अपघात झाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी वारंवार दूरभाष करूनही रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह एका छोट्या वाहनातून न्यावा लागला. अपघातातील ट्रक पोलिसांनी जप्त केला असून या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.