नागठाणे (जिल्हा सातारा) कोरोनाबाधिताची आत्महत्या

कोरोनाच्या आपदेत मनोबल वाढण्यासाठी साधनेला पर्याय नाही !

सातारा, ५ मे (वार्ता.) – नागठाणे पंचक्रोशितील गणेशवाडी गावातील विलास कोंडीराम साळुंखे (वय ६५ वर्षे) यांनी कोरोनाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गत १५ दिवसांपासून ते कोरोनाने आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते; मात्र ४ मेच्या पहाटे गावातीलच पाटक नावाच्या शिवारात ते निघून गेले. घरातल्यांनी त्यांना शोधतशोधत शिवार गाठले. तेव्हा नायलॉनच्या दोरीने त्यांनी बोरीच्या झाडाला गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. याविषयी त्यांचे बंधू संजय कोंडीराम साळुंखे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.