पुणे – शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डमधील गर्दी कमी करण्यासाठी समितीच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या आहेत. यामध्ये आतील आणि बाहेरील गाळे दिवसाआड चालू ठेवण्यात येत आहेत; मात्र काही अडत्यांनी आतील बाजूचे गाळे बंद असतांनाही ते चालू ठेवले होते. त्यामुळे समितीने फळ विभागातील संबंधित अडत्यांवर दंडात्मक कारवाई करत २० सहस्र ६० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनानुसार फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी ही दंडात्मक कारवाई केली. अडते नियम मोडतांना आढळून आल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून समितीला सहकार्य करावे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी सांगितले.