केजरीवालांची अटक पूर्णपणे चुकीची ! – शरद पवार

राज्याच्या प्रमुखाला अटक करणे आणि त्याने धोरणे ठरवली म्हणून त्यासाठी अटक करणे हे पूर्णपणे गैरवाजवी आहे, चुकीचे आहे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा १०० टक्के परिणाम राज्यातील जनतेवर होणार आहे, असे वक्तव्य बारामती दौर्‍यात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन केले.

(म्हणे) ‘आज आमच्याकडे खर्च करण्यासाठी २ रुपयेही नाहीत !’ – राहुल गांधी यांचा दावा

बँक खाती गोठवून १ महिना उलटला आहे. या काळात काँग्रेसने पक्षाच्या कार्यक्रमासाठी, भारत न्याय यात्रेसाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत, हे पैसे काँग्रेसने कुठून आणले, याचा हिशेब राहुल गांधी यांनी आधी दिला पाहिजे !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर काम करेल ! –  प्रा. सुरेशनाना जाधव, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभा’ १५ ते १७ मार्च या कालावधीमध्ये नागपूर येथे झाली. त्यांना सरसंघचालक पू. डॉ. मोहन भागवत आणि सरसहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी मार्गदर्शन केले. या सभेच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

४ सहस्र ५०० संशयितांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.

Loksabha Elections 2024 : ५० सहस्र रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रोख रक्कम बाळगतांना कागदपत्रे आवश्यक !

या काळात जे नागरिक ५० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम बाळगतील, त्यांनी त्यासंबंधी पुरावा असलेली कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा हे पैसे जप्त केले जातील, अशी चेतावणी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू !

लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग  मतदारसंघासाठी ७ मे २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

सांगली येथील अनधिकृत पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत ! – विनायक येडके, अध्यक्ष, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना

सांगली येथे अनधिकृतपणे पशूवधगृह चालू असतांना ते बंद करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना का करावी लागते ? सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला हे दिसत नाही का ? प्रदूषण नियंत्रण मंडळातील संबंधित अधिकार्‍यांनाही हे लक्षात येत नाही का ?

वसंत मोरे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा !

माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून वागणुकीवर आक्षेप घेतले जात होते. अशा ठिकाणी न राहिलेलेच बरे, असे वसंत मोरे यांनी १२ मार्चला मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.

मोदी पंतप्रधान नसते, तर बंगाल बांगलादेशात गेला असता ! – आचार्य प्रमोद कृष्णम्

पंतप्रधान मोदी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत नसते, तर बंगाल बांगलादेशमध्ये गेला असता, असे विधान काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी पत्रकार परिषदेत येथे केले.

Islam Sinicisation : शिनजियांगमध्ये आतंकवाद अजूनही अस्तित्वात असल्याने इस्लामचे चिनीकरण अपरिहार्य आहे ! – चीन

चीन हे उघडपणे असे सांगत असतांनाही जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडत नाही.