५ राज्यांतील निवडणुका घोषित : ३ डिसेंबरला निकाल

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

नवी देहली – केंद्रीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर या दिवशी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

सौजन्य: Election Commission of India

छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर अशा २ टप्प्यांत मतदान होणार आहे. मध्यप्रदेशात १७ नोव्हेंबर आणि राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला, तर तेलंगाणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत.