किती वेळा ग्रंथ वाचले याला महत्त्व नाही, तर त्यातल्या किती ओळी जीवनात अंगीकारता हे महत्त्वाचे !

भलेही एक उतारा (पॅराग्राफ) वाचा किंवा फारतर ४ ओळीच वाचा; पण वाचलेल्या वचनांचे चिंतन-मनन करून त्यांना जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करा. जर एक ओळही तुम्ही जीवनात अंगीकारली, तर ते वाचन सार्थक होईल.’

मांसाहार म्हणजे अभक्ष भक्षण (जे भक्षण्यास योग्य नाही ते) !

आपण ज्या प्राण्याचे मांस खाऊ त्या प्राण्याचे स्वभाव-गुणधर्म आपल्यात उतरतात. थोडक्यात आपल्या वृत्तीत फरक पडतो. तमोगुणी अथवा रजोगुणी प्रवृत्ती जोपासली जाते.

विशेषांकाद्वारे सनातन संस्थेची महती सांगायला मिळाल्याविषयी कृतज्ञता !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी (२५ व्या) वर्धापनदिनानिमित्त ‘सनातन संस्थेच्या व्यापक कार्याची केवळ तोंडओळख’ म्हणावी, अशी माहिती या ‘सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव’ विशेषांकात दिली आहे. सनातन संस्थेच्या दिव्य, अलौकिक कार्याविषयीची माहिती जिज्ञासू वाचकांपर्यंत पोचवण्याची संधी आम्हाला प्राप्त झाल्याविषयी कृतज्ञता !

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘मी तुम्हाला कळकळीने विनवतो की, सर्वांनी टाळ्या वाजवून मुखाने विठ्ठल नामाचा गजर करा.’’

बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

तरुणपणी अधिक पैसा मिळवला, तर म्हातारपण सुखाचे जाते. त्याचप्रमाणे तरुणपणी साधना केली, तर म्हातारपण सुखाचे जाते.