जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी परप्रांतीय हिंदु कामगारांवर केला गोळीबार : ३ जण घायाळ  

काश्मीरमध्ये अद्यापही स्थानिक आणि परप्रांतीय हिंदु सुरक्षित नाहीत, हेच अशा घटनांतून सतत लक्षात येत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

४ वर्षांपूर्वी विद्वेषी विधाने केल्याचे प्रकरण

केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते एकात्मिक आयुष उपचारपद्धती सेवांचे गोव्यात उद्घाटन

एकात्मिक आयुष उपचारपद्धती सेवा पुरवणारे गोवा हे देशातील पहिले केंद्र ! भारताने जगाला सर्वोत्तम उपचारपद्धती दिल्या. त्यामुळे जगात आयुषची विश्वासार्हता वाढली आहे. गोव्यात या उपचारपद्धतींचा स्थानिकांबरोबरच पर्यटकांनाही लाभ होईल.

‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार देण्यावरून वाद निर्माण !

‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या संघटना, तसेच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने विरोध दर्शवला आहे.

आतंकवादी संघटना धर्माची प्रतिमा मलिन करतात ! – ‘वर्ल्ड मुस्लिम लीग’चे प्रमुख अल्-ईसा

एकीकडे अल्-ईसा हे आतंकवादी संघटना धर्माची प्रतिमा मलिन करत असल्याचे विधान करतात, तर दुसरीकडे आतंकवादी संघटनांना धर्म किंवा देश नसतो, असेही म्हणतात ! या परस्परविरोधी वक्तव्यांतून अल्-ईसा यांचा दुटप्पीपणा उघड होतो !

गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

मथुरेच्या राधा राणी मंदिरातही वस्त्रसंहिता !

यमुना नदीला आलेल्या पुरामुळे देहलीत सर्वत्र पाणी !

हरियाणातील हथनीकुंड धरणातून सातत्याने सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे यमुना नदीला पूर आला आहे. १३ जुलैला तर पाण्याने २०८.६६ मीटरची पातळी गाठली होती. यामुळे सर्वोच्च न्यायालयाबाहेरील रस्त्यावर पाणी साचले होते.

‘चंद्रयान ३’ मोहीम भारतीय अवकाश संशोधनात ऐतिहासिक ठरेल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘चंद्रयान-३’ ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटी यांचे प्रतीक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रातही भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चंद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण आहे.

सर्वोच्च न्यायालयाची विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थन करणार्‍या १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणी मागण्यामागील सूत्रधार हा लष्कर-ए-तोयबाचा जिहादी आतंकवादी !

भारतातील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी दुर्दम्य राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता !