शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात २ घंटे चर्चा !

अदानी समूहाचे मालक गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वरळी येथे शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी भेट झाली.

नवी मुंबईत पावसाळापूर्व गटार स्‍वच्‍छतेचे काम ६५ टक्‍के पूर्ण !

नवी मुंबई महापालिकेच्‍या क्षेत्रातील पावसाळापूर्व गटारातील गाळ काढणे हे काम ६५ टक्‍के झाले असल्‍याची माहिती घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपायुक्‍त बाबासाहेब राजळे यांनी दिली.

राज्‍यातील अन्‍य भाषिक, तसेच केंद्रीय शाळांमध्‍ये होणार मराठीचे मूल्‍यांकन !

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील ३ वर्षे वरील शाळांतील ८ वी, ९ वी आणि १० वी च्‍या इयत्तांमधील विद्यार्थ्‍यांचे मूल्‍यांकन केले जाणार आहे. यामुळे या शाळांतील विद्यार्थ्‍यांना मराठी भाषा कितपत आकलन होत आहे, याचा अभ्‍यास करता येणार आहे.

एकनाथ खडसे यांसह पत्नी आणि जावई यांनी भूमी अवैधरित्‍या खरेदी केल्‍याचे मुंबई न्‍यायालयाचे निरीक्षण !

सादर पुराव्‍यांचा विचार करता एकनाथ खडसे, त्‍यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील भूमी अवैधरित्‍या संपादित केल्‍याचे सकृतदर्शनी स्‍पष्‍ट होते, असे निरीक्षण मुंबई उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे.

रस्‍ता खोदतांना जलवाहिनी फोडणार्‍या ठेकेदाराला ८ लाख रुपयांचा दंड !

जलवाहिनी फुटल्‍याने स्‍थानिक भागातील पाणीपुरवठा २ दिवस खंडित झाल्‍याने रहिवाशांचे पुष्‍कळ हाल झाले. नागरिकांनी विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. नागरिकांच्‍या या रोषाला सामोरे जात महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला होता.

जारमधून पिण्‍याच्‍या पाण्‍याची विक्री करण्‍यासाठी यापुढे सरकारची अनुमती लागणार !

यापुढे जारमधून पाणी विकण्‍यासाठी अन्‍न आणि औषध प्रशासन विभागाची अनुमती घ्‍यावी लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा ! – मंत्री रवींद्र चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत आणि होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

भूखंडाअभावी दारावे ग्रामस्‍थ सामाजिक सुविधांपासून वंचित !

दारावे गावामध्‍ये कार्यक्रमासाठी समाज मंदिर, सांस्‍कृतिक भवन, महिला मंडळासाठी भवन, ज्‍येष्‍ठांसाठी विरंगुळा केंद्र, खेळण्‍यासाठी मैदान हे भूखंड सिडकोकडून मिळाले नाहीत. महापालिकेची स्‍थापना होऊन २८ वर्षे झाली, तरी ग्रामस्‍थ सामाजिक सुविधांपासून वंचित आहेत.

माझ्‍याविषयी आणि सहकारी यांच्‍याविषयी दाखवत असलेल्‍या वृत्तांमध्‍ये तथ्‍य नाही! – अजित पवार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

गेल्‍या काही दिवसांपासून अजित पवार आणि त्‍यांचे ४० सहकारी राष्‍ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून सत्ताधार्‍यांना पाठिंबा देणार असल्‍याची वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. त्‍या संदर्भात अजित पवार यांनी पत्रकारांसमोर ही भूमिका मांडली.