‘स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍ट’च्‍या माध्‍यमातून देण्‍यात आलेल्‍या राख्‍या सैनिकांचे मानसिक बळ वाढवतील ! – बंडू कात्रे, सुभेदार मेजर

‘स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍ट’च्‍या माध्‍यमातून देण्‍यात आलेल्‍या राख्‍या सैनिकांचे मानसिक बळ वाढवतील ! – बंडू कात्रे, सुभेदार मेजर

केवळ युद्धाच्‍या वेळी नव्‍हे, तर अहोरात्र देश संरक्षणासाठी कार्यरत  असणार्‍या सैनिकांचे स्‍मरण ठेवून माता-भगिनींनी ‘स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍ट’च्‍या माध्‍यमातून पाठवलेल्‍या राख्‍यांमुळे सैनिकांचे मनोधैर्य नक्‍कीच वाढणार आहे, असे मनोगत सुभेदार मेजर बंडू कात्रे यांनी व्‍यक्‍त केले.

पूर्वीचे ऐतिहासिक कोल्‍हापूर उभे करण्‍याचा प्रयत्न ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

पूर्वीचे ऐतिहासिक कोल्‍हापूर उभे करण्‍याचा प्रयत्न ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

पूर्वीच्‍या स्‍थितीत कोणताही आधुनिकपणा न आणता जुन्‍या पद्धतीने ऐतिहासिक वारसा असलेले पूर्वीचे ऐतिहासिक कोल्‍हापूर उभे करण्‍याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांना दिली.

आजपासून भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे जवळून दर्शन घेता येणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

आजपासून भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे जवळून दर्शन घेता येणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

कोरोना महामारीच्‍या काळापासून गेले ३ वर्षे साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन पितळ्‍या उंबर्‍यातून आतून बंद करण्‍यात आले होते. हे दर्शन २९ ऑगस्‍टपासून भाविकांना चालू करण्‍यात येत आहे.

‘हर घर सावरकर’ अभियानातून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या विचारांचा जागर ! – राजेश क्षीरसागर

‘हर घर सावरकर’ अभियानातून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या विचारांचा जागर ! – राजेश क्षीरसागर

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे देशप्रेम आणि हिंदुत्‍वाचे विचार आपल्‍यामध्‍ये नेहमीच उत्‍साह आणि देशप्रेम जागवतात. अत्‍यंत प्रेरणात्‍मक विचार स्‍वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंमध्‍ये रूजवले. याच विचारांचा जागर ‘हर घर सावरकर’ या संकल्‍पनेतून करण्‍यात येणार आहे.

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना कधी थांबणार ?

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना कधी थांबणार ?

करवीर म्हणजे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी जागृत शक्तीपीठ म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे स्वरूप विद्रूप झाल्याची वार्ता मार्च २०२३ मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये झळकली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.

कोल्‍हापूरसारख्‍या ऐतिहासिक शहरात काम करायला मिळाले हे माझे भाग्‍य ! – के. मंजूलक्ष्मी, आयुक्‍त, कोल्‍हापूर

कोल्‍हापूरसारख्‍या ऐतिहासिक शहरात काम करायला मिळाले हे माझे भाग्‍य ! – के. मंजूलक्ष्मी, आयुक्‍त, कोल्‍हापूर

कोल्‍हापूर महापालिकेच्‍या आयुक्‍त के. मंजूलक्ष्मी यांनी २३ ऑगस्‍टला पदभार स्‍वीकारला. पदभार स्‍वीकारल्‍यानंतर त्‍यांनी साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

श्री स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍टच्‍या वतीने ‘देशरक्षाबंधन’ उपक्रमाच्‍या अंतर्गत १ लाखांहून अधिक राख्‍या सीमेवर पाठवण्‍याचा संकल्‍प ! – किशोर घाटगे

श्री स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍टच्‍या वतीने ‘देशरक्षाबंधन’ उपक्रमाच्‍या अंतर्गत १ लाखांहून अधिक राख्‍या सीमेवर पाठवण्‍याचा संकल्‍प ! – किशोर घाटगे

श्री. किशोर घाटगे पुढे म्‍हणाले, ‘‘देशरक्षकांचे नैतिक बळ वाढवण्‍यासाठी विविध शाळा-महाविद्यालये, महिला बचत गट, व्‍यक्‍ती, संस्‍था यांच्‍याकडून या राख्‍या गोळ्‍या करून थेट सीमेवर पाठवण्‍यात येत आहेत.”

श्रीक्षेत्र वाघापूर (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे नागपंचमी भावपूर्ण वातावरणात साजरी !

श्रीक्षेत्र वाघापूर (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे नागपंचमी भावपूर्ण वातावरणात साजरी !

महाराष्‍ट्र-कर्नाटक राज्‍यातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या श्रीक्षेत्र वाघापूर (तालुका-भुदरगड) येथील ज्‍योतिर्लिंगाची नागपंचमीची यात्रा भावपूर्ण वातावरणात साजरी करण्‍यात आली.

कोल्‍हापूर महापालिकेच्‍या आयुक्‍तपदी के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्‍ती !

कोल्‍हापूर महापालिकेच्‍या आयुक्‍तपदी के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्‍ती !

गेल्‍या अडीच मासांपासून रिक्‍त असलेल्‍या कोल्‍हापूर महापालिकेच्‍या आयुक्‍तपदी अखेर के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्‍ती झाली आहे. त्‍या २३ ऑगस्‍टला पदाचा कार्यभार स्‍वीकारतील. के. मंजुलक्ष्मी या सध्‍या सिंधुदुर्गच्‍या जिल्‍हाधिकारी म्‍हणून कार्यरत आहेत.