वाघापूर (जिल्हा कोल्हापूर) – महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वाघापूर (तालुका-भुदरगड) येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमीची यात्रा भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या यात्रेसाठी सहस्रो भाविक उपस्थित होते. पहाटे ५ वाजता शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर आणि त्यांच्या पत्नी सौ. विजयालक्ष्मी यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा पार पडली. यानंतर महाआरती झाल्यावर मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
यात्रा कालावधीत महिला भाविकांनी लाह्या घेऊन नागदेवतेची गाणी म्हटली. या यात्रेसाठी गारगोटीसह अनेक आगारातून अधिकच्या जादा ‘एस्.टी.’ सोडण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी अन्नछत्र उभारून भाविकांना अन्नदान करण्यात आले.