
कोल्हापूर, २२ ऑगस्ट (वार्ता.) – ‘श्री स्वामी विवेकानंद ट्रस्ट’च्या वतीने कारगील युद्धापासून गेली २४ वर्षे ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या वतीने ‘देशरक्षाबंधन’ उपक्रमाच्या अंतर्गत १ लाखांहून अधिक राख्या सीमेवर पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा उपक्रम २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता महादेव मंदिर, मराठा बटालियन या ठिकाणी होणार आहे. तरी इच्छुकांनी विविध संकलन केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत राख्या पाठवाव्यात, असे आवाहन ‘श्री स्वामी विवेकानंद ट्रस्ट’चे श्री. किशोर घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी सर्वश्री राजा मकोटे, महेश कामत, अशोक लोहार, कमलाकर किलकिले, डॉ. सायली कचरे, सौ. सीमा मकोटे, माधुरी नकाते यांसह उपस्थित होते.
श्री. किशोर घाटगे पुढे म्हणाले, ‘‘देशरक्षकांचे नैतिक बळ वाढवण्यासाठी विविध शाळा-महाविद्यालये, महिला बचत गट, व्यक्ती, संस्था यांच्याकडून या राख्या गोळ्या करून थेट सीमेवर पाठवण्यात येत आहेत. शहरातील विविध ठिकाणी या राख्या संकलित करण्यात येणार आहेत.’’
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !