कोल्हापूर – मी यापूर्वीही श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात येत असे. कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक शहरात काम करायला मिळाले, हे माझे भाग्य आहे. कोल्हापूर शहरातील प्राथमिक गरजा ओळखून येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भर देणार आहे. आजच सर्व विभागांचे आढावे घेऊन प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन, असे प्रतिपादन कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी केले. पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होत्या.
कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी २३ ऑगस्टला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी श्रीपूजन, महापालिकेचे उपायुक्त यांसह अन्य उपस्थित होते.