कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्ववत्

अतीवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी यांना महापूर आला होता. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेला होता. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले.

बेळगाव (कर्नाटक) प्रवेशासाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक !

महाराष्ट्रातून बेळगाव (कर्नाटक) प्रवेशासाठी आता ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या पूर्वी ज्यांनी कोरोना प्रतिबंधक एक लस घेतली आहे, त्यांना प्रवेश दिला जात होता…..

गेली दोन वर्षे आमच्याकडे कुणीच पाहिले नाही ! – चिखली (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थ

हे ग्रामस्थ पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार. आदित्य ठाकरेसाहेब आले होते. त्यांनीही पाहिले नाही. आम्ही आमच्या कामाला लागणार, तुम्ही तुमच्या कामाला लागणार. परत कुणी आमच्याकडे बघणार नाही.’’ 

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने ४५० गावांमध्ये भूस्खलन

पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ सहस्र १८९ हेक्टर भूमी भूस्खलनामुळे बाधित झाली आहे.

सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ साहाय्य घोषित करावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

जिल्ह्यातील प्रयाग चिखली येथील दौर्‍यावर असतांना ते बोलत होते.

यापुढे ‘रेड झोन’मधील बांधकामांना अनुमती नको ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल, तर ११ जिल्ह्यांतील निर्बंध कायम रहाणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, त्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत…

पूरस्थितीनंतर ३२ मार्गांवर वाहतूक चालू !

यामध्ये कोल्हापूर-पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर ४ दिवसांपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनाही स्वत:च्या गावी सुखरूप पोचता आले आहे, अशी माहिती एस्.टी.च्या वाहतूक विभागाने दिली.

अनेक भागांत एकाच दिवसात ३२ इंच पाऊस झाल्याने पूर ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोल्हापुरात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन अल्प आकाराच्या मोर्‍या आहेत. बर्‍याचदा गाळ, दगड किंवा झाडे वाहून आल्यामुळे या मोर्‍या बंद होतात.

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाचे संकट !

राज्यातील कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.