नवरात्रोत्सवात प्रतिघंट्याला १ सहस्र भाविकांना दर्शन मिळावे असे नियोजन ! – शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

भाविकांची वाढती संख्या पहाता ८ ऑक्टोबर या दिवशी प्रायोगिक तत्त्वावर ९०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात बाँब ठेवल्याचा निनावी दूरभाष !

राज्यातील ७ ऑक्टोबरपासून सर्व मंदिरे उघडल्याने, तसेच श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी होती.

पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ब्रह्माणी मातृका स्वरूपातील पूजा !

ब्रह्माणी ही ब्रह्मदेवाची शक्ती आहे. ती चार मुख आणि चतुर्भुज आहे.

जनताभिमुख लोकप्रतिनिधी हवेत !

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. ‘हसन मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे’, असा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

नवरात्रोत्सवाची सिद्धता पूर्ण : प्रतिघंट्याला ७०० भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे ‘ई-दर्शन पास’द्वारे दर्शन होणार !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली आहे. संपूर्ण मंदिरावर विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.

कापशी (जिल्हा कोल्हापूर) येथील ६ वर्षाच्या बालकाची अपहरण करून हत्या !

शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव राजेश केसरे या ६ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबरला पहाटे उघडकीला आली.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर महापालिकेची कोट्यवधींची भूमी हडप केली ! – माजी महापौर सुनील कदम यांचा आरोप

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्तेचा अपलाभ उठवत कोल्हापूर महापालिकेची कोट्यवधी रुपयांची भूमी हडप केली आहे.

७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ‘ई-दर्शन पास’ असलेल्यांनाच दर्शन मिळणार !

नवरात्रीत पहिल्या दिवशी म्हणजे ७ ऑक्टोबरपासून साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले श्री महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. श्री महालक्ष्मी मंदिरात केवळ ‘ई-दर्शन पास’ असलेल्यांना दर्शन मिळणार आहे.

किल्ले विशाळगड येथे झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देणार्‍या लोकांवर कारवाई करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना कोल्हापूर यांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृतीच्या समिती’ने चालू केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने तेथील अवैध बांधकामे करणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत आहेत.

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील प्राचार्या डॉ. विजया रवींद्र चव्हाण यांना राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२१’ प्रदान !

पेठवडगाव येथील ‘श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ’ संचालित ‘श्री विजयसिंह यादव कला आणि विज्ञान महाविद्यालया’च्या प्राचार्या डॉ. विजया रवींद्र चव्हाण यांच्या शैक्षणिक कार्याची नोंद घेत ‘अविष्कार फाऊंडेशन’ यांच्या वतीने त्यांना ‘राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२१’ प्रदान करण्यात आला.