कोल्हापूर, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रात पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ब्रह्माणी मातृका रूपातील पूजा बांधण्यात आली होती. ब्रह्माणी ही ब्रह्मदेवाची शक्ती आहे. ती चार मुख आणि चतुर्भुज आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात माळ, कमंडलू, ग्रंथ, घंटा आहे. तिचे वाहन हंस आहे. याच समवेत जोतिबा देवाची खाऊच्या पानातील (नागवल्ली) राजदरबारी राजेशाही थाटामधील बैठी सालंकृत महाअलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.