असुरक्षित महाराष्ट्र !
कोल्हापूर, ६ ऑक्टोबर – शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव राजेश केसरे या ६ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबरला पहाटे उघडकीला आली. या बालकाच्या मृतदेहावर हळद-कुंकू, गुलाल आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे वरिष्ठ अधिकार्यांसह घटनास्थळी उपस्थित झाले असून मारेकर्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता आरव मित्रांसमवेत अंगणात खेळत होता. साडेसहा वाजता तो अचानक बेपत्ता झाला. नातेवाइकांनी शोध घेतला; पण रात्री उशिरापर्यंत आरव सापडू शकला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात आरव बेपत्ता असल्याची तक्रार प्रविष्ट केली. ४ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांसह नातेवाइकांनी आरवचा शोध घेतला असता तो सापडला नाही. ५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी एका व्यक्तीच्या घराच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक अन्वेषण चालू केले असून आरवचे कुणी आणि कशासाठी अपहरण केले याचे अन्वेषण करण्यात येत आहे.
पन्हाळा ते पावनखिंड ७५ व्या अमृत महोत्सवी मोहिमेस प्रारंभ !
सनातनचा युवा साधक यदुनंदन अजिंक्य वरेकर गुणवत्ता शोध परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण !
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !