स्नायूंची पुनर्बांधणी (रिकव्हरी) होण्याकरता विश्रांती घेण्यासह थोडे चालणे, शरिराला ताण देणे (स्ट्रेचिंग) किंवा शरिराची सौम्य हालचाल करणे आवश्यक असते !
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. ‘शरीर चांगले रहाण्याच्या दृष्टीने आणि स्नायू अधिक बलवान होण्याच्या दृष्टीने विश्रांती घेणे, म्हणजे नेमके काय करणे अपेक्षित आहे’, ते पाहूया.