रानभाज्या या खर्या तर आरोग्याचा खजिना असतात. अशा रानभाज्यांची ओळख करून देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयाकडून चालू केलेल्या या मालिकेत आजची भाजी आहे गुळवेल !
(भाग १३)
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/943651.html
गुळवेल

गुळवेल एक बहुपयोगी औषधी वनस्पती आहे. वारुडवेल, अमृतवेल, अमृतवल्ली अशी स्थानिक नावे आहेत. हिंदीत ‘गिलोय’, तर संस्कृतमध्ये ‘गडुची’ किंवा ‘अमृता’ नावाने ओळख आहे. ताप, तहान, जळजळ, वांती (उलटी) यांवर उपयुक्त आहे. पित्तवृद्धीच्या काविळीत गुणकारी आणि त्वचारोगात उपयोगी आहे. वारंवार मूत्र वेग, तसेच प्लीहा वृद्धीत उपयुक्त, कुष्ठ आणि वातरक्तविकारातही उपयुक्त आहे.

गुळवेलीची भाजी मंदावलेले पचन, पित्त, अपचन यांवर उपयुक्त आहे. ती भूक वाढवते आणि शरिराला शक्ती देते. कोणत्याही प्रकारचा ताप न्यून करण्यास साहाय्य करते. कावीळ न्यून होण्यास साहाय्य होते. मधुमेहींसाठी साखरेची पातळी नियंत्रित करते आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा न्यून करते. नेहमीच्या सर्दी, खोकला, ताप यांवर गुणकारी. रक्तातील दोष कमी करून त्वचेचे विकार बरे करण्यास साहाय्य करते. कामाचा ताण आणि शारीरिक थकवा दूर करते.
अ. भाजी करण्याची पद्धत : गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. गरम तेलात चिरलेला कांदा आणि लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर चिरलेली गुळवेलीची भाजी तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे. वाफ देऊन भाजी शिजवून घ्यावी.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?