लेखांक क्र. ७५
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. या लेखमालेतून आम्ही व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करून व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न करणार आहोत. या लेखात आपण ‘व्यायाम हे शरीर सुधारण्यासह योग्य जीवनशैली, पारिवारिक समतोल आणि समृद्धी यांच्यासाठी उत्तम साधन असणे !’, यांविषयी जाणून घेऊया.

१. पूर्वीच्या काळी लोकांचे सर्वार्थाने समृद्ध असण्याकडे लक्ष असणे
‘पूर्वीच्या काळी लोक सर्वार्थाने समृद्ध होण्यासाठी लक्ष देत असत, उदा. आर्थिक समृद्धीसह कौटुंबिक समृद्धी (आनंदी आणि एकत्रित कुटुंब असणे), नात्यातील समृद्धी (नाती जिव्हाळ्याची असणे), बौद्धिक समृद्धी (बुद्धी तेजस्वी आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारी असणे), नैतिक समृद्धी (चारित्र्यवान असणे आणि व्यसन नसणे). या सर्वांचा दीर्घकाळ आनंद घेण्यासाठी शारीरिक समृद्धी (शरीर निरोगी आणि बलवान) असणे आवश्यक आहे.
२. केवळ आर्थिक समृद्धीमागे धावल्यामुळे समाज आणि कौटुंबिक व्यवस्था बिघडत असणे
सध्या लोक केवळ आर्थिक समृद्धीच्या मागे धावत असल्यामुळे त्यांना नाती, भावना, चारित्र्य, तसेच शरीर यांचाही विसर पडतो. मिळवलेल्या पैशातून आनंद न घेता त्यांचे आयुष्य कौटुंबिक तंटे, मानसिक ताण आणि शारीरिक दुखणी यातच जाते. एका अर्थाने आपण शरीर, मन आणि समाज यांच्या स्तरावर दारिद्र्य अनुभवतो. थोडक्यात सांगायचे झाले, तर अर्थार्जन करण्याचे आताचे अनेक मार्ग समाज आणि कौटुंबिक व्यवस्था बिघडवत आहेत.

३. व्यायाम केल्याने होणारे लाभ
३ अ. नियमित व्यायाम करणार्यांमध्ये स्वयंशिस्त आणि भावनिक संतुलन यांचे प्रमाण अधिक असणे : व्यायामाने स्वतःवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. त्यामुळे आपण खाणे-पिणे आणि व्यय यांवर नियंत्रण ठेवू लागतो. संशोधनानुसार नियमित व्यायाम करणार्यांमध्ये स्वयंशिस्त आणि भावनिक संतुलन यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यांना बचत आणि गुंतवणुकीचे निर्णय चांगल्या प्रकारे घेता येतात.
३ आ. व्यक्ती योग्य जीवनशैलीकडे वळणे : सध्या सर्व जण जलद पैसा मिळवण्यामागे धावत असतात. यामुळे शरिरातील ‘डोपामाईन’चे (आनंद, उत्साह आणि प्रेरणा देणार्या संप्रेरकाचे) स्रवण वाढते. आपली बुद्धी जलद मिळणार्या लाभांमध्येच गुरफटून रहाते. धीर धरण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता न्यून होते अन् भावनिक दुर्बलता येते. हा मार्ग व्यक्तीला कामात अधिक गुंतवून ठेवणारा आणि कष्ट करवून घेणारा असतो; याउलट व्यायाम हा ‘डोपामाईन’चा नैसर्गिक अन् संतुलित स्रोत असल्यामुळे व्यक्ती योग्य जीवनशैलीकडे वळते. तिला शरीर, मन आणि नाती सांभाळून काम करण्याची सवय लागते. सर्व मोठे व्यावसायिक पुष्कळ गतीने किंवा एका रात्रीत उच्च स्तराला पोचले नसून स्वतःची आणि इतरांची काळजी घेत, तो स्तर साध्य करू शकले.
३ इ. ‘कॉर्टिसॉल’ संप्रेरकाची (हॉर्माेनची) पातळी नियंत्रणात येऊन उतावीळपणा न्यून होणे आणि विचारांमध्ये स्पष्टता येणे : कामाच्या तणावामुळे ‘कॉर्टिसोल’ या संप्रेरकाची (शरिरातील तणाव, ऊर्जेचा वापर, रक्तातील साखर इत्यादींना नियंत्रणात ठेवणार्या संप्रेरकांची) पातळी वाढून आपण अधिक भावनाशील होतो. त्या ओघात आपल्याला उशिरापर्यंत काम करत रहाणे, विचार न करता व्यय करणे इत्यादी चुकीच्या सवयी लागतात. केवळ १० मिनिटे मध्यम तीव्रतेचा नियमित व्यायाम केल्यामुळे ‘कॉर्टिसॉल’ची पातळी नियंत्रणात येऊन उतावीळपणा न्यून होतो आणि विचारांमध्ये स्पष्टता येऊ लागते. यामुळे पद्धतशीर विचार करण्याची सवय लागून कृतींमध्ये शिस्त येते आणि याचेच प्रतिबिंब आर्थिक व्यवस्थापनातही दिसते.
३ इ. आजारी पडल्यावर होणारा प्रचंड व्यय, वेळ आणि श्रम टाळले जाणे : व्यायामामुळे अप्रत्यक्षपणेही आपला बराच व्यय वाचतो. जगात होणार्या एकूण मृत्यूंपैकी ६७ टक्के मृत्यू मधुमेह, हृदयविकार, कर्करोग आिण श्वसनाचे विकार यांमुळे होतात. नियमित व्यायामामुळे हे ४ विकार टाळणे शक्य होते. केवळ मृत्यूच नव्हे, तर शारीरिक दुर्बलता, व्याधी, अपंगत्व, मानसिक रोग, तसेच आर्थिक तणाव निर्माण करण्यातही हे ४ विकार अग्रेसर आहेत. व्यायामाच्या अभावामुळे निर्माण होणार्या या आणि अशा अनेक विकारांच्या केवळ औषधोपचारांवर होणारा व्यय हा अनुमाने ४ ते ७ सहस्र रुपये प्रतिमास असतो. सध्याचे आयुमान ६० ते ६५ वर्षे धरल्यास, ४० व्या वर्षी कुणाला यांपैकी रोग झाला, तर उर्वरित २० वर्षांत त्याचा खर्च १० लाख ते १७ लाख रुपये होऊ शकतो.
रुग्णाला गंभीर रोग झाल्यावर अनेक वेळा रुग्णालयात भरती व्हावे लागते. रुग्णालयात भरती झाल्यावर एका वेळी उपचार करून घेण्याचा व्यय अनुमाने दीड लाख ते २.५ लाख रुपये होतो. अशा रुग्णांना विविध कारणांसाठी प्रत्येक १० वर्षांमध्ये २ – ३ वेळा तरी रुग्णालयात भरती व्हावे लागते. वरील उदाहरण पहाता रुग्णाला न्यूनतम ५ ते ८ वेळा रुग्णालयात भरती व्हावे लागेल, असे गृहित धरल्यास साडेबारा लाख ते २० लाख रुपये व्यय होऊ शकतो, म्हणजेच एकूण व्यय अनुमाने ३० लाख ते ४७ लाख रुपये होऊ शकतो. व्यायाम करून आपण रोग टाळण्यासह पैसा, वेळ आणि श्रम यांची बचत करून या त्रासांपासून दूर राहू शकतो.
यावरून लक्षात येते की, व्यायाम हे केवळ स्वतःचे शरीर सुधारण्याचे माध्यम नसून योग्य जीवनशैलीचे, कौटुंबिक समतोल सांभाळण्याचे आणि खर्या अर्थाने समृद्धीकडे जाण्याचे उत्तम साधन आहे. त्याचप्रमाणे साधकांना सेवा चांगली करता यावी यासाठी त्यांनी निरोगी रहाणे आणि सर्व श्रम, त्रास, वेळ वाचवणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे व्यायाम नियमित करण्याकडे लक्ष द्यावे.’ (२५.६.२०२५)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?