पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्या अनेक वनस्पती उगवतात, त्यातील अनेक वनस्पती या खाण्यायोग्य असतात. या वनस्पती विशेषत: आदिवासींनी शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. या रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची लागवड, उत्पादन, विक्री अशी साखळी निर्माण करून शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास साहाय्य मिळणार आहे. आज ‘कुडा’ या रानभाजीची माहिती येथे देत आहे.
(भाग १०)
याआधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/942553.html
कुडा
ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. जी स्थानिक पातळीवर ‘पांढराकुडा’ म्हणून ओळखली जाते. तिच्या विविध औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेद आणि पारंपरिक औषध पद्धत यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. कुड्याची फुले पांढरी शुभ्र असून ती आकर्षक दिसतात. या झाडाला लांब शेंगा येतात, ज्या जोडीने वाढतात. कुड्याच्या सालीचा उपयोग त्वचा विकारांवर होतो. कुटजारिष्ट हे प्रसिद्ध औषध कुड्याच्या सालीपासून बनवले जाते.

कुड्याची मुळे, साल आणि बिया मूळव्याध, रक्तस्रावयुक्त मूळव्याध अन् अतिसारासारख्या पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहेत. कुड्याच्या सालीचा वापर विविध त्वचाविकारांच्या उपचारात होतो. कुड्याच्या बियांचे चूर्ण नियमितपणे घेतल्यास अन्नपचन सुधारते आणि पोटात वायू धरत नाही, ज्यामुळे पोटासंबंधी समस्या न्यून होतात. कुड्याची पाने शक्तीवर्धक असून ती स्नायूंचे दुखणे न्यून करण्यास साहाय्य करतात.
थोडक्यात, कुडा ही एक बहुउपयोगी औषधी वनस्पती असून ती विविध आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापरली जाते.
तथापि कोणत्याही औषधी वनस्पतीचा वापर करण्यापूर्वी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
– श्री. प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/943214.html

अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !