प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग कंटकाकीर्ण (काट्याकुट्यांनी भरलेला अत्यंत कष्टप्रद) आहे. एकट्यानेच ही वाटचाल करायची आहे. त्यात नाना संकटे, नाना अडथळे आहेत. हे टाळण्याकरता स्वधर्मानुसार कर्म आचरले पाहिजे.

मनुष्‍यजीवन आणि अध्‍यात्‍म !

आद्यशंकराचार्यांकडे एक अनोळखी माणूस ब्रह्मज्ञानाविषयी काही शंका विचारायला आला. आचार्यांनी त्‍याच्‍या शंकेचे योग्‍य समाधान केले. तो दुसर्‍या दिवशी परत आला.

तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता यांचे महत्त्व !

तीव्र मुमुक्षू, व्याकुळता आणि तगमगता ही शिष्याची पात्रता प्रकट करते. गुरूंकडे जायची योग्यता आणि अधिकार ती व्याकुळता बहाल करते. अशा श्रेष्ठ अधिकार्‍याला परमगुरु भगवंतच उपदेश करतात.

सनातन हिंदु धर्मशास्त्राचे मंडन आणि पाखंडाचे खंडण करणारे प.पू. गुरुदेव !

दिवसाचे १८ घंटे सतत लेखन करत प.पू. गुरुदेवांनी अक्षरवाङ्मय निर्माण केले. धर्मावरील पाखंडांच्या आघातांचे खंडण केले. ‘अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही । चाबूक उडो कोठेही, वळ पाठीवर आमच्या ।’ या वृत्तीने त्यांनी पाखंड खंडणाचे कार्य स्वीकारले.

होळी म्‍हणजेच मदनाचे दहन !

होळीला महाराष्‍ट्रात ‘शिमगा’ म्‍हणतात. (दक्षिणेत होळीला ‘कामदहन’ म्‍हणतात. ‘हुताशनी’, ‘दौलयात्रा’, अशीही होळीला नावे आहेत.) देवळासमोर किंवा सोयीच्‍या ठिकाणी पौर्णिमेच्‍या सायंकाळी होळी पेटवायची. बहुधा गावाच्‍या ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.

गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या ७ पवित्र नद्यांचे महत्त्व !

शतकाआधीची नर्मदा आजही तशीच आहे, पावन आणि विपुल ! तशीच ती पुढेही राहील. ‘पुण्या सर्वत्र नर्मदा ।

ज्ञानियांचा सहजभाव

‘श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘जो कर्मफलाचा आसरा न घेता कर्म करतो तो खरा योगी ! करणीय कर्म करणार्‍यापेक्षा महान, श्रेष्ठ कुणीही नाही. तोच संन्यासी, तोच योगी. केवळ निरग्नी वा अक्रिय हा संन्यासी वा योगी नाही. वरील व्याख्येप्रमाणे जीवन व्यतित केलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !

गुरुदेवांच्या वाङ्मय लेखनप्रपंचामागील कारण !

मानव जन्म भगवत्प्राप्तीसाठी तर आहे. त्यासाठी जर काही प्रयत्नच नाही केले, तर अखेरीला भगवंतच विचारील, ‘तुला जीवन दिले, काय केले तू या जीवनाचे ? काय मिळवले ? कोणती पूर्णता साधली ? कोणता महिमा प्राप्त केला ?

विज्ञानवाद

‘विज्ञानवादाचे अपत्य औद्योगीकरण ! तेथे नीती कशी नांदेल ? अर्थकामासक्त, चंगळवादी, भोगलोलुप, जडवादाच्या धुक्यात, मानव कल्याणाची सनातन हिंदु धर्म संस्कृतीची वाट हरवली आहे.’

विश्वातील परमात्म्यास जाणा !

‘वर्णव्यवस्थेत विषमता आहे. वैषम्य नाही. प्रकृतीच वैषम्याच्या भेदावर उभी आहे. वैषम्य आहे; म्हणून तर भेद आहेत; म्हणून तर सृष्टी आहे; म्हणून तर जीवन आहे. जीवनात नित्य नूतनता, ताजेपणा आणि रस आहे.