कल्‍याणकारी गुरूंची शिष्‍याला पटलेली महती !

सद्गुरू भक्तराज महाराज

शिष्‍याच्‍या जीवनात गुरूंचे महत्त्व अनन्‍यसाधारण आहे; कारण गुरूंविना त्‍याला ईश्‍वरप्राप्‍ती होऊच शकत नाही. गुरूंचे भक्‍तवत्‍सल रूप, दयाळू दृष्‍टी, कृपा करण्‍याची माध्‍यमे यांद्वारे त्‍याला गुरूंच्‍या अंतरंगाचे दर्शन घडते. त्‍यातूनच त्‍याची गुरूंविषयीची भक्‍ती दृढ होऊन त्‍याला गुरूंच्‍या अस्‍तित्‍वाचा अधिक लाभ करून घेता येतो. शिष्‍याला गुरूंचे महत्त्व पटलेले असते; कारण त्‍याला गुरूंमधील आध्‍यात्‍मिक सामर्थ्‍याची प्रचीती आलेली असते. गुरूंचे महत्त्व पटले की, नराचा नारायण होण्‍यास वेळ लागत नाही; कारण गुरु हे देवाचे सगुण रूपच असल्‍याने ज्‍याला गुरूंनी स्‍वीकारले, त्‍याला देवताही स्‍वीकारत असल्‍याने जिवाचे आपोआपच कल्‍याण होते. हा कल्‍याणकारी मार्ग अवलंबणे, हेच खरे नरजन्‍माचे उद्दिष्‍ट असले पाहिजे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्‍य’)