पाकमध्ये मदरशामध्ये बलात्कार करणार्‍या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) जन्मठेपेची शिक्षा

पाकच्या एका न्यायालयाने १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अतीक उर् रहमान नावाच्या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला २ लाख रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.

पुण्यात ‘ई-चलना’द्वारे वाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड भरण्यास नागरिकांची न्यायालयात गर्दी !

ई-चलन भरण्यासाठी नागरिकांनी न्यायालयात सकाळपासून गर्दी केली होती; परंतु दंडाचे प्रकरण निकालात काढण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

शाळकरी मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या २७ वर्षीय महिलेला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

पुरुषांच्या बरोबरीने आता महिला लैंगिक अत्याचारही करण्यात अग्रेसर आहेत, असे यातून म्हणयाचे का ?

वाहनांच्या क्रमांकाच्या पाट्या विविध माध्यमांतून लपवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना ५ सहस्र रुपयांचा दंड होणार !

देहली पोलिसांनी लोकांना ‘अशा गाड्या दिसल्या की, त्यांची छायाचित्रे काढून पोलिसांच्या ट्विटर, फेसबूक आदी सामाजिक माध्यमांच्या खात्यांवर पोस्ट करा’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुखपट्टी न वापरणार्‍या ३३ लाख मुंबईकरांकडून ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल !

मुखपट्टी न वापरणार्‍या ३३ लाख नागरिकांवर कारवाई करत ६६ कोटी ७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई महापालिका आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. 

पुण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७७ कोटी रुपयांची दंड आकारणी !

अनेकांना त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात आल्याचे संदेश येतात; मात्र ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पोलिसांनी कितीही दंड आकारणी केली तरी तो वसूल होण्याचे प्रमाण प्रतिदिन न्यून होत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चौकशी समितीकडून २५ सहस्र रुपयांचा दंड !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बारमालकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली केल्याच्या आरोपाचे प्रकरण

नागूपर येथे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या दीड लाख वाहनचालकांनी ७ कोटी रुपयांचा दंड थकवला !

अकार्यक्षम वाहतूक पोलीस यंत्रणा !

सिंहगड, खडकवासला (पुणे) येथे येणार्‍या पर्यटकांकडून ८८ सहस्र रुपयांचा दंड वसूल !

हवेली पोलिसांनी सिंहगड आणि खडकवासला परिसरात येणार्‍या १७७ पर्यटकांवर कारवाई करून ८८ सहस्र ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

ब्रिटनमधील ‘केर्न एनर्जी’ आस्थापनाला भारताच्या पॅरिसमधील अब्जावधी रुपयांच्या २० मालमत्ता कह्यात घेण्याचा फ्रान्स न्यायालयाचा आदेश !

‘केर्न एनर्जी’ या ब्रिटनमधील आस्थापनाने भारताच्या विरोधात  फ्रान्समध्ये प्रविष्ट केलेला खटला जिंकला आहे. त्यामुळे फ्रान्सच्या न्यायालयाने भारताच्या पॅरिसमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या २० मालमत्ता या आस्थापनाला कह्यात घेण्याचा आदेश दिला आहे.