असे संपूर्ण देशात करायला हवे !
उत्तराखंडमधील ५ सहस्र एकरहून अधिक भूमी ‘लँड जिहाद’द्वारे बळकावण्यात आली होती. ती सर्व भूमी सरकारने मुक्त केली आहे,
उत्तराखंडमधील ५ सहस्र एकरहून अधिक भूमी ‘लँड जिहाद’द्वारे बळकावण्यात आली होती. ती सर्व भूमी सरकारने मुक्त केली आहे,
मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी पाकने फेटाळली आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झारा बलूच यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आरोपींच्या प्रत्यार्पणासंदर्भात कोणताही करार नाही.
बांगलादेशी घुसखोरांनी पुण्यात ६०४ बनावट पारपत्रे मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून चौकशी चालू आहे, तसेच या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे.
नाताळानिमित्त अभिनेते रणबीर कपूर यांनी केकवर दारू ओतली आणि त्याला आग लावली अन् ‘जय माता दी’ असे म्हटले.
‘काँग्रेसला भगवान श्रीरामांमुळे अडचण होती. आता देशात श्रीरामाचे उघडपणे समर्थन केले जात आहे’, असे विधान काँग्रेसची विदेशातील शाखा ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केले.
‘पंतप्रधान मोदी यांनी ‘हिंदु कोणताही धर्म नाही’, असे म्हटले होते, तेव्हा भावना दुखावल्या जात नाहीत; मात्र मी असे विधान केल्यावर भूकंप होतो’, असे द्वेषमूलक विधान समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.
देवास (मध्यप्रदेश) येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत आहे
केंद्र सरकारने मुसलमान महिलांसाठीचा ‘तिहेरी तलाक’ प्रकार कायद्याद्वारे रहित केला असतांनाही गेल्या ५ वर्षांत आतापर्यंत १३ लाख ७ सहस्रांहून अधिक तिहेरी तलाकच्या घटना घडल्या आहेत.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राज्यात गेल्या पावणेदोन वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालये यांत हिजाब परिधान करण्यावर असलेली बंदी उठवण्याचा आदेश दिला आहे.
गुजरातमधील शाळांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवली जाणार आहे, अशी माहिती गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी दिली.