भारतात हिंदुत्वनिष्ठ असुरक्षित !

फरीदाबाद (हरियाणा) येथे बजरंग दलाच्या २ कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक आक्रमणात आलोक नावाचा कार्यकर्ता ठार झाला, तर शिवम हा कार्यकर्ता गंभीररित्या घायाळ झाला. पोलीस यामीन, राजा आणि गुगा यांचा शोध घेत आहेत.

पाकव्याप्त काश्मीर परत घ्या !

पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानचे नागरिक अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरून पाकिस्तान सरकारचा निषेध करत आहेत. त्यांना भारतात समाविष्ट व्हायचे आहे. त्यांनी स्वतःच्या  घरांवर भारताचा तिरंगा ध्वज फडकावला आहे.

अभिनेते कमल हासन यांचा हिंदुद्रोह जाणा !

‘उदयनिधी यांना सनातन धर्मावर त्‍यांची मते मांडण्‍याचा अधिकार आहे. जर तुम्‍ही त्‍यांच्‍या दृष्‍टीकोनांशी असहमत असाल, तर सनातन धर्माची वैशिष्‍ट्ये सांगणारी चर्चा घडवून आणा’, अशी प्रतिक्रिया अभिनेते कमल हासन यांनी व्‍यक्‍त केली.

अयोध्‍येला पर्यटन केंद्र नव्‍हे, तर हिंदूंचे धार्मिक शिक्षण केंद्र बनवा ! 

अयोध्‍येत सध्‍या ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्‍प उभारून अयोध्‍येला जगातील सर्वांत मोठे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्‍याचे सरकारचे ध्‍येय आहे.

स्‍वतःच्‍या धर्माविषयी हास्‍यास्‍पद प्रश्‍न विचारणारे काँग्रेसचे हिंदु मंत्री !

‘जगात अनेक धर्म जन्‍माला आले आहेत; परंतु हिंदु धर्म केव्‍हा आणि कसा जन्‍माला आला ?, याविषयी मात्र अजूनही प्रश्‍नचिन्‍हच आहे’, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील मंत्री जी. परमेश्‍वर यांनी केले.

देशाला ‘भारत’ नावासह हिंदु राष्ट्र घोषित करा !

‘भारताच्या राज्यघटनेत पालट करून ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’ हेच नाव ठेवावे’, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना केली.

काँग्रेसवाल्‍यांचा हिंदुद्वेष जाणा !

‘जो धर्म तुम्‍हाला समान अधिकार देत नाही, तो धर्म एखाद्या रोगाप्रमाणे आहे’, अशी हिंदु धर्मावर अप्रत्‍यक्ष टीका काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी उदयनिधी स्‍टॅलिन यांच्‍या विधानावरून केली.

द्रमुकने आधी डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना यांना संपवून दाखवावे ! 

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र, तसेच राज्याचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘आपल्याला डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना यांच्याप्रमाणे सनातन धर्मालाही संपवायचे आहे’, असे विधान ‘सनातन निर्मूलन परिषदे’त केले. 

काँग्रेसच्या राज्यात साधूसंत असुरक्षित !

राजस्थानमधील टोंकमध्ये श्री महादेव मंदिराचे महंत सियाराम दास बाबा बुरिया (वय ९३ वर्षे) यांची हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधीलच डीडवाना कुचामण जिल्ह्यात संत मोहनदास यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

असा निर्णय सर्वच महाविद्यालयांनी घ्यावा !

कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याच्या अर्जासमवेतच एक प्रतिज्ञापत्रही देण्यात आले आहे. यात ‘कधीही महाविद्यालयाच्या आवारात फाटलेली जीन्स आणि आक्षेपार्ह कपडे परिधान करणार नाही’, असे नमूद करण्यात आले आहे.