हिंदूंनी झटका मांसाचा उपयोग करावा !
‘गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या ‘होसतोडकू’ या सणाच्या वेळी हलाल मांसाच्या ऐवजी झटका मांसाचा उपयोग करावा’, असे आवाहन कर्नाटकातील समस्त हिंदु संघटनांच्या संघाने केले आहे.
‘गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या ‘होसतोडकू’ या सणाच्या वेळी हलाल मांसाच्या ऐवजी झटका मांसाचा उपयोग करावा’, असे आवाहन कर्नाटकातील समस्त हिंदु संघटनांच्या संघाने केले आहे.
हलाल मांस हा एक ‘आर्थिक जिहाद’ आहे. ‘हलाल मांसच वापरावे’, असे त्यांना (मुसलमानांना) जेव्हा वाटते, तेव्हा ‘ते वापरू नका’, असे सांगण्यात अयोग्य काय आहे ?, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी केला.
सौदी अरेबियाच्या सरकारने मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा, तसेच केवळ ‘अजान’ (नमाजपठणाला बोलावण्यासाठी आवाहन करणे) आणि ‘इकामत’ (नमाजासाठी दुसऱ्यांदा आवाहन करणे) यांसाठी वापर करण्यात यावा, असा आदेश दिला आहे.
उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करणार्या राज्यातील कठघरही गावातील बाबर या मुसलमान तरुणाला त्याच्याच धर्मबांधवांनी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
कर्नाटक राज्यातील चिंचणी गावातील सरकारी शाळेतील श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची, तर हरोहल्ली गावातील शाळेत असणार्या श्री सरस्वतीदेवी, म. गांधी आणि स्वामी विवेकानंद यांच्याही मूर्तींची तोडफोड करण्यात आली.
बीरभूम (बंगाल) येथे पोलिसांनी २०० हून अधिक गावठी बाँब जप्त केले आहेत. तसेच राज्यातील पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील सालानपूरमध्ये पोलिसांनी शस्त्रे बनवणार्या कारखान्यावर धाड टाकून मोठ्या संख्येने बाँब जप्त केले.
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यात आल्यावर देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘हा चित्रपट ‘यूट्यूब’वर प्रदर्शित करा ! हा चित्रपट खर्या घटनांवर नव्हे, तर असत्यावर आधारित आहे’, असे संतापजनक विधान केले.
कर्नाटक राज्यातील ‘कर्नाटक धार्मिक संस्थान आणि धर्मार्थ बंदोबस्ती अधिनियम २०२२’च्या नियम १२ नुसार हिंदूंच्या धार्मिक स्थळाजवळ असलेली भूमी अहिंदूंना दिली जाऊ शकत नाही.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हिजाबबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी कर्नाटक राज्यात मुसलमानांकडून बंद पाळण्यात आला होता. त्यात मुसलमान दुकादारांनीही सहभाग घेतला होता.
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते भादू शेख यांची हत्या करण्यात आल्यानंतर येथे काही घरांची जाळपोळ करण्यात आली. यात १० जणांना जिवंत जाळून ठार मारण्यात आले.