हिंसाचार करणार्यांचा आदर्श असणार्या पुस्तकांवर बंदी कधी घालणार ?
रामचरितमानसमध्ये सर्व काही कचरा आहे. हाच धर्म आहे का ? रामचरितमानसवर बंदी घातली पाहिजे, अशी संतापजनक मागणी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केली आहे.
रामचरितमानसमध्ये सर्व काही कचरा आहे. हाच धर्म आहे का ? रामचरितमानसवर बंदी घातली पाहिजे, अशी संतापजनक मागणी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केली आहे.
भोंग्यांद्वारे ध्वनीप्रदूषण केल्याच्या प्रकरणी हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी पूरणसिंह राणा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.
पाकिस्तानने देशातील सर्व विद्यापिठांमध्ये कुराण शिकवणे अनिवार्य केले आहे. कुराण शिकवण्याच्या निर्णयामागे विद्यार्थ्यांना कुराण वाचण्यासाठी प्रेरित करणे, हा उद्देश आहे. त्यामुळे हिंदु आणि इतर समाजातील विद्यार्थी यांनाही कुराण वाचावे लागेल.
‘बीबीसी न्यूज’ने ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ या शीर्षकाच्या अंतर्गत दोन भागांची मालिका बनवली आहे. यात गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीतील पंतप्रधान मोदी यांची कथित भूमिका आणि दंगलीत ठार झालेल्या शेकडो लोकांवरून आरोप केले आहेत.
‘चॅट जीपीटी’ या तंत्रज्ञान प्रणालीकडून हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अवमान करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. याच प्रणालीमध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता आदी देवता, तसेच रामायण यांसारख्या धर्मग्रथांविषयी अवमान करणारे विनोद ऐकवले जात आहेत.
कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील ‘ख्राईस्ट सी.एम्.आय. पब्लिक स्कूल’ने मकरसंक्रांतीच्या दिवशी, म्हणजे रविवारी सुट्टी असतांनाही वर्ग घेतल्याने हिंदु जागरण वेदिकेने शाळेच्या कृतीचा विरोध केला.
करीमगंज (आसाम) येथे शंभू कोइरी या १६ वर्षांच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अमीनुल हक याला अटक केली आहे.
बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी ‘मनुस्मृति’ आणि ‘रामचरितमानस’ यांना ‘द्वेष पसवणारे ग्रंथ’, म्हटले होते. आता त्यांचा एक जुना व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांनी ‘प्रेम आणि विश्वास यांचा संदेश देणारा केवळ इस्लाम आहे’, असे म्हटले आहे.
तमिळनाडूतील द्रमुक सरकारचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी १२ जानेवारी या दिवशी विधानसभेत रामसेतू तोडून करण्यात येणार्या ‘सेतूसमुद्रम् जलमार्ग’ प्रकल्पाला समर्थन देणारा ठराव संमत केला.
दक्षिण आफ्रिकेचा मुसलमान क्रिकेटपटू हाशिम आमला याने एका हिंदु कुटुंबाचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्वर याने केला. हाशिम आमला आय.पी.एल्.मध्ये ‘पंजाब किंग्ज’ या संघाकडून खेळत असतो.