शंभूराजांना हाल हाल करून मारणाऱ्या ‘औरंगजेबा’चे नाव हटवण्यासाठी लोकशाही मार्गाने चालू केलेली मोहीम आहे ! – सूरज आगे, प्रमुख, शिवप्रहार प्रतिष्ठान
वैजापुरातील ‘शिवप्रहार’च्या शंभू मेळाव्यात ‘संभाजीनगर’ नामकरण करण्यासाठी सहस्रो तरुणांचा निर्धार !
वैजापुरातील ‘शिवप्रहार’च्या शंभू मेळाव्यात ‘संभाजीनगर’ नामकरण करण्यासाठी सहस्रो तरुणांचा निर्धार !
धर्मवीर संभाजी महाराज यांचा पराक्रम आणि बलीदान यांची माहिती युवा पिढीला व्हावी, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी फाल्गुन मास हा ‘बलीदान मास’ म्हणून साजरा केला जातो.
सु.ग. शेवडेगुरुजी म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणलाच गेला नाही. ज्या महिला जन्मालाच आल्या नव्हत्या, अशा महिला निर्माण करून त्यांच्याशी संभाजी महाराज यांचा संबंध जोडण्यात आला. त्यांना व्यसनी असल्याचे भासवण्यात आले.’’
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचे स्मरण म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या असा बलीदान मास पाळण्यात येतो. समारोपप्रसंगी प्रतिकात्मक अंत्ययात्रा-मूकपदयात्रा काढण्यात येते.
शंभूराजांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात यश कशामुळे आले, तो त्यांच्या साधनेचा, म्हणजे त्यांनी जगून दाखवलेल्या अध्यात्माचा भाग दुर्लक्षित केला जातो. यासंदर्भात विविध मान्यवरांनी केलेले विवेचन येथे देत आहोत.
महाराष्ट्रात काही महाभागांनी ‘गुढ्या उभारणे, हा शंभूराजांचा अपमान आहे’, असे सांगत कित्येकांना गुढ्या उभारू दिल्या नाहीत. उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या. विचारस्वातंत्र्य आणि पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्या महाराष्ट्रात असे घडणे, हे चिंताजनक आहे.
या धर्मवीर ज्वालेमधून प्रज्वलित करून जिल्हाभर धर्मवीर ज्वाला नेण्याचे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नगर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना केले आहे.
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाच्या स्मरणार्थ बलीदान मासाच्या अखेरीस प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात येतो.
दानोळी गावातील धर्मप्रेमीनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मासाच्या निमित्ताने १४ मार्च २०२२ या दिवशी गावातील लोकांना विषय सांगण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले होते.