आज छत्रपती संभाजी महाराज जयंती

पोर्तुगीज-मराठा संघर्ष अखेरपर्यंत चालूच !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

पोर्तुगीज आणि छत्रपती संभाजीराजे या दोघांचे युद्ध छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूपर्यंत चालू राहिले. तोपर्यंत मराठ्यांनी पोर्तुगीज अमलाखालचा जो प्रदेश काबीज केला होता, त्याचा पुष्कळसा भाग मराठ्यांच्या हाती होता. गोव्याचा गव्हर्नर दॉ रुद्रिगु द कॉश्त हा २४.१.१६८८ या दिवशी पोर्तुगालच्या राजास लिहितो, ‘छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चालू असलेल्या युद्धास अजून विराम पडलेला नाही. ते विजरेई कॉट द आल्व्होर यांच्या कारकीर्दीत चालू झाले होते.

(साभार : पोर्तुगीज-मराठा संबंध या ग्रंथामधून संक्षिप्त. साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या सौजन्याने)