मध्यप्रदेशात धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत मुसलमानांकडून पोलीस ठाण्यासमोर हैदोस !

जमावाने ‘पोलिसांनी यादव यांच्यावर कारवाई न करता त्यांना सोडून दिले’, असा आरोप केला. जमाव हिंसक होत आहे, हे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार केला.

चीनचे परराष्ट्र मंत्री गेल्या १ मासापासून बेपत्ता !

अमेरिकेत हेरगिरी करणारे फुगे सोडण्यात आले होते. त्यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले होते. त्या वेळी गैंग यांनी आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला फटकारले होते.

‘ओपेनहायमर’ चित्रपटातून श्रीमद्भगवद्गीतेचा अवमान होणार्‍या प्रसंगाला अनुमती कशी दिली ?

सेन्सॉर बोर्ड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्याच्याकडून अशा प्रकारच्या चुका कशा होतात ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात नेहमीच उपस्थित होतो.

न्यायालयांच्या परिसरात केवळ म. गांधी आणि संत तिरुवल्लुवर यांच्याच प्रतिमा लावण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !

मद्रास उच्च न्यायालयाने परिपत्रक प्रसारित करत सांगितले की, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील न्यायालयांच्या परिसरात केवळ म. गांधी अन् संत तिरुवल्लुवर यांच्या प्रतिमा आणि पुतळेच लावले जावेत.

चिपळूण येथील पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांना ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार प्रदान

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सह्याद्री वाहिनीशी संवाद साधतांना श्री. धीरज वाटेकर यांनी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पर्यावरणनीती आजही मार्गदर्शक, असल्याचे नमूद केले.

अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून अमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी. कृषी विभाग, वन विभागांनी अमली पदार्थ विशेषत: गांजा लागवडीविषयी दक्ष रहावे.

गुरुवर्य पू. संभाजी भिडेगुरुजी यांना सतत विशेष सुरक्षाव्यवस्था द्यावी !

हिंदु सकल समाजाची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी -मणीपूर आणि देशभरामध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात ठोस कारवाई करा !  

#Exclusive : ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे केंद्र राज्याबाहेर जाऊ न देता कोकणातच रहाणार !

‘‘रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हा सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत आपत्तीचा फटका बसतो. विशेषत: दरडप्रवण क्षेत्रात दुर्घटना घडतात. त्यामुळे ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथका’चे पथक रायगड येथेच स्थापन व्हावे, यासाठी राज्यशासन या प्रकरणात लक्ष घालेल.’’

आमदारांना असमान निधीवाटप करणे, हा जनतेवर अन्याय ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या कालावधीत एकाही विरोधी पक्षातील आमदारांना वाढीव निधी दिला नाही. त्यांनीच हा पायंडा पाडला.

सेवाभावी वृत्तीने चालणार्‍या वास्तूंच्या व्यायसायिक भाड्यात सरकार कपात करणार !

लोकप्रतिनिधींच्या निधीतून बांधण्यात येणार्‍या व्यायायशाळा, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक संघ आदी वास्तू सेवाभावी वृत्तीने चालवल्या जातात. त्यांना व्यावसायिक दराने भाडे आकारणी केली जाते.